आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची लुबाडणूक, भामट्यास अटक; कागदाचे बंडल देऊन लांबवले हाेते 16 हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डिमांड ड्राफ्टने तीन लाख रुपये पाठवायचे असल्याचे भासवून तरुणाच्या हातात कागदांचे बंडल टेकवत त्याच्याकडील १६ हजार रुपयांची रोकड भामट्याने लांबवल्याचा प्रकार २१ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरातील एका बँकेत घडला हाेता. याच भामट्याने गुरूवारी धुळ्यातील एका बँकेत एका तरुणाला गंडवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने नागरिकांच्या मदतीने भामट्याला पकडून पाेलिसाच्या स्वाधीन केले. त्याला जळगाव शहर पोलिस सोमवारी ताब्यात घेणार आहेत.

 

निवृत्ती एकनाथ जाधव (वय ४५, रा.मोहपाडा, कचेरीरोड, पालघर) असे या भामट्याचे नाव आहे. तो मुळ राहणार पिंपरखेड (ता.भडगाव) येथील आहे. जाधव याने २१ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात एका बँकेत प्रशांत मिश्रा या तरुणास १६ हजार रूपयात गंडवले होते. मिश्रा हा पगार झाल्यानंतर तो १६ हजार रुपये घरी पाठवण्यासाठी बँकेत गेला हाेता. याच वेळी जाधव व त्याच्या साथीदाराने प्रशांतकडून ३ लाख रूपयांची डिमांड ड्राफ्टची स्लीप भरुन घेतली.

 

नंतर नोटांच्या बंडलप्रमाणे दिसणारी कागदाची गड्डी मिश्रा याच्या हातात दिली. त्यानंतर त्याच्याकडील १६ हजार रूपयांची राेकड घेऊन दोघांनी पोबारा केला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत भामट्यांचा शोध सुरू केला होता. तत्पूर्वी हे भामटे त्याच दिवशी रात्री धुळे येथे निघून गेले हाेता.

 

यांनतर २२ फेब्रुवारी रोजी त्यांनी धुळ्यातील एका बँकेत जाऊन अशाच प्रकारे तरुणास लुबाडण्याचा प्रयत्न केला; परंतु, सुदैवाने तरुणासह बँकेत हजर असलेल्या काही नागरिकांनी भामट्याचा हेतू ओळखून त्याची उलटतपासणी केली. संशय बळावल्यानंतर त्याला पकडून धुळे शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला खाक्या दाखवताच त्याने जळगावात केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. शहर पोलिसांचे पथक जाधव याला साेमवारी ताब्यात घेणार आहे. जाधव सध्या धुळ्याच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

बातम्या आणखी आहेत...