आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • यावलमध्ये घरफोडी.. ST कर्मचार्‍याच्या घरातील सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली Robbery In Yawal, ST Employees Home

यावलमध्ये घरफोडी.. ST कर्मचार्‍याच्या घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरातील फैजपूर रस्त्यावरील पूर्णवाद नगरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोडी झाली. कुटुंबातील लोक छतावर झोपले असताना चोरट्यांनी डाव साधला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 5000 असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे


फैजपूर रस्त्यावर लगत असलेल्या पूर्णवाद नगरमध्ये मुरलीधर तुळशीराम पाटील राहातात. ते राज्य परिवहन मंडळात नोकरीला आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरात उकाडा होत असल्याने सर्व कुटुंबीय छतावर झोपले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात असलेले 34 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 5000 रुपये असा तब्बल सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीची गस्त पोलिसांनी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घरफोडीचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...