आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंच्या कुटुंबियांची बदनामी; लेवा समाजाने यावलमध्ये काढला मूक मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी प्रकरणी नगरसेवक सुधाकर धनगर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्या करीता मंगळवारी दुपारी लेवा समाजाने भुसावळ रस्त्यापासून ते थेट तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले मूक मोर्चा, प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा, तहसिलदारांना निवेदन देत केला.

 

घटनेचा निषेध

मंत्री आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची त्यात खासदार रक्षाताई खडसे व जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा अॅड रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या बदनामी करण्याच्या उद्देशाने नगरसेवक सुधाकर धनगर यांनी एक क्लिप तयार केली व महिला दिनाच्या दिवशी अशा प्रकारचे कृत्य केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील लेवा पाटील समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी 4 वाजता शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला व तहसिलदार कुंदन हिरे यांना नगरसेवक सुधाकर धनगर यांच्यावर कठोर कारवाई तसेच हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास लेवा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक राकेश कोलते, नगरसेविका देवयानी महाजन, पोर्णिमा फालक, प्रमोद नेेमाडे, लेवा समाजचे अध्यक्ष सलील महाजन, बाळू फेगडे, धीरज महाजन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य हर्षल पाटील, राजेश करांडे, यश पाटील, पराग बोरोले, जगदीश करांडे, प्रकाश महाजन, सविता फेगडे, हेमराज फेगडे, नितिन महाजन यांच्यासह मोठ्या संख्येत लेवा समाजातील महिला व पुरूष सहभागी झाले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... लेवा समाजाच्या मूक मोर्चाचे फोटो आणि व्हिडिओ..

 

 

बातम्या आणखी आहेत...