आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाईच्या मृत्यूने खचलेल्या मुलाची पुण्यात गळफास घेऊन अात्महत्या, बापासमाेर दु:खाचा डाेंगर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगावच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन पुणे येथे अात्महत्या केली. अात्महत्येपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली अाहे; पण त्यात काय लिहिले अाहे? याबाबत माहिती अद्याप समाेर अालेली नाही. मात्र, अाईच्या अकाली निधनानंतर ताे खचला हाेता, असे सांगण्यात येत अाहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक शनिवारी रात्री पुणे येथून जळगावकडे रवाना झाले. रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार हाेणार अाहेत.

 

प्रशांत विलास हाेले (रा. श्रद्धा काॅलनी, सानेगुरुजी काॅलनीजवळ, जळगाव) असे मृत अभियंत्याचे नाव अाहे. त्याचे वडील विलास हाेले हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत अाहेत. त्यांना दाेन मुले असून त्यात प्रशांत हा माेठा हाेता. त्याचे जळगावात महाविद्यालयीन शिक्षण झाले अाहे. ताे गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला हाेता. त्याने दाेन वर्षांपूर्वी पुण्यात रावेत येथील एस.बी.पाटील राेडवरील तुळजा भवानी हाऊसिंग साेसायटीमध्ये फ्लॅट घेतला हाेता. तर त्याचे एक वर्षापूर्वीच फैजपूर येथे लग्न झाले हाेते. पुण्यात ताे पत्नी साेबत राहत हाेता. त्याच्या पत्नीचे माहेर हे परळी वैजनाथ येथील असून ती प्रसूतीसाठी माहेरी गेली हाेती. त्यामुळे प्रशांत घरात एकटाच हाेता. त्याने शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास फॅनला लटकून गळफास घेऊन अात्महत्या केली. अात्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने चिठ्ठी लिहून ठेवलेली अाहे. त्यात काय लिहिले अाहे? ही माहिती समाेर अालेली नाही.

 

वडिलांचा फाेन घेतला नाही
प्रशांतला त्याचे वडील विलास हाेले यांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी माेबाइलवरून संपर्क केला हाेता; पण त्याने फाेन घेतला नाही. उलट पुणे पाेलिसांकडूनच त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे ते लगेचच पुण्याला रवाना झाले. नातेवाईक अाल्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात अाला. प्रशांतचा मृतदेह घेऊन त्याचे वडील, लहान भाऊ व इतर नातेवाईक जळगावकडे निघाले अाहेत. ते रात्री उशीरा जळगावात पाेहाेचल्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची अंत्ययात्रा श्रद्धा काॅलनीतील राहत्या घरापासून काढण्यात येणार अाहे.


शनिवारी येणार हाेता जळगावात
पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने प्रशांत एकटाच घरात हाेता. त्यात नाेकरीत बदल करण्याचा विचार करीत हाेता. याबाबत वडिलांना भेटून चर्चा करण्यासाठी ताे शनिवारी जळगावात येणार हाेता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र, त्यापूर्वीच त्याने अापली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त हाेत अाहे.

 

वडिलांचा फाेन घेतला नाही
प्रशांतला त्याचे वडील विलास हाेले यांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी माेबाइलवरून संपर्क केला हाेता; पण त्याने फाेन घेतला नाही. उलट पुणे पाेलिसांकडूनच त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे ते लगेचच पुण्याला रवाना झाले. नातेवाईक अाल्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात अाला. प्रशांतचा मृतदेह घेऊन त्याचे वडील, लहान भाऊ व इतर नातेवाईक जळगावकडे निघाले अाहेत. ते रात्री उशीरा जळगावात पाेहाेचल्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची अंत्ययात्रा श्रद्धा काॅलनीतील राहत्या घरापासून काढण्यात येणार अाहे.

 

पत्नीची १० दिवसांनंतर हाेणार हाेती प्रसूती : प्रशांतच्या पत्नीला डाॅक्टरांकडून प्रसूतीसाठी १० दिवसानंतरची तारीख देण्यात अालेली अाहे. तिच्या अाई- वडिलांना या घटनेची माहिती देण्यात अाली असून ते तिला घेऊन जळगावात येण्यासाठी नि‌घाले अाहेत.

 

दाेन वर्षांपूर्वी अाईचा कॅन्सरने मृत्यू
प्रशांतचे वडील महापालिकेत तर अाई एमडीएस कंपनीत कामाला हाेती. तिला कॅन्सरने ग्रासले हाेते. त्यातच दाेन वर्षांपूर्वी त्याच्या अाईचा मृत्यू झालेला अाहे. माेठा असल्याने त्यांच्यावर अाईचे अधिक प्रेम हाेते. अाईच्या मृत्यूने ताे हताश हाेता. त्यातून सावरत त्याने वर्षभरापूर्वी लग्न केले हाेते. अाता कुठे नवीन अायुष्याला सुरुवात हाेत असताना त्याने कशासाठी टाेकाचे पाऊल उचलेले? याबाबत नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त हाेत हाेती.

 

 

बातम्या आणखी आहेत...