आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर: मांडळ येथे अज्ञात टोळक्याने एसटी बस जाळली, सुदैवाने मोठी हानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- तालुक्यातील मांडळ येथे अमळनेर डेपोच्या एसटी बसला अज्ञात टोळक्याने जाळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आगीत बस जळून खाक झाली आहे. चालक-वाहक ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये झोपल्याने मोठी हानी टळली.

 

अमळनेर आगारातून मांडळ येथे मुक्कामी बस (एमएच 14 बीटी 0419) रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुटली व ती मांडळ गावाला नऊ वाजता पोहोचली. प्रवासी उतरल्यावर बसचे चालक-वाहक जेवण करून ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये झोपले.  रात्री अचानक बस पेटताना गावकऱ्यांना दिसली व गावकऱ्यांनी झोपलेले चालक-वाहकाला ही बाब कळवली. बस विझविण्यासाठी गावकऱ्यांनी पाणीपुरवठा नळ सोडून बस विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत बसचा वरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने आग डिझेलच्या टाकीपर्यंत पोहचली नाही. अन्यथ मोठी हानी झाली असती. बसचे इंजिन सुरक्षित आहे.

 

आगीची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. जळगाव एसटी विभागाचे प्रमुख पंकज महाजन, एएमई आरव्ही देवरे, एस.बी. बाविस्कर, डीएम आर.एन.बाविस्कर, एडब्ल्यूएस पी.एफ. धडे,  एयुएस जी. आर. पाटील घटनास्थळाची पाहाणी केली.

 

बसच्या टायरवर ज्वलनशील पदार्थ ठेवून अज्ञात टोळल्याने ही आग लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अज्ञात टोळक्याने जाळलेल्या बसचे फोटो आणि व्हिडिओ...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...