आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या सरकारने जनतेची फसवणूक केली, तटकरेंचा हल्लाबोल, गिरीश महाजनांवर टीका, खडसेंचा उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- या फसव्या सरकारने गेल्या साडेचार वर्षात शेतकरी शेतमजूर आणि उद्योजक यांना हलाखीचे जीवन आले. आहे. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे जे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी युती सरकारवर टीका करत आसूड ओढले.

 

येथील ग्लोबल स्कूल जवळील मैदानावर दुपारी सभेला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, वरिष्ठ नेते भास्करराव जाधव, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, सामाजिक न्याय सेलचे जयदेव गायकवाड, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, विजयाताई पाटील, जयश्री पाटील, ललित पाटील  यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेस सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते गस दरवाढीच्या निषेधार्थ चूल पेटवून निषेध करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम आणि संजय पाटील यांनी केले.

 

सकाळी १० वाजता दुचाकी रली चोपडाई कोंढावळ येथे आगमन झाले त्यावेळी अनिल भाईदास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डांगर येथे राष्ट्रवादी शाखा फलक अनावरण करण्यात आले. रली सह गाड्यांचा ताफा बसस्थानक, दगडी दरवाजा सुभाष चौक, स्टेशन रोड त्यानंतर सभास्थळी आगमन झाले. यापूर्वी अरुणभाई गुजराथी, गफ्फार मलिक, सुरेखा ठाकरे यांनी आपले विचार मांडले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... अमळनेरात पोहोचलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात कोण काय म्हणाले...

 

बातम्या आणखी आहेत...