आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बंदला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीचार्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत व्यापार्‍यांनी धान्य खरेदी करून शेतकर्‍यांची लूट केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदला शहाद्यात हिंसक वळण लागले. भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांच्या गाडया उलटवल्याने काहीसे तणावाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनशाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहादा बंद करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील म्हणाले, बाजार समिती प्रशासनाला कायदयाच्या चौकटीत राहून कार्य करावे लागते. बंदमुळे हमाल मापाडयांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून हरभर्‍याला इतर बाजारपेठेच्या तुलनेत अधिक भाव दिला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्‍यांची लूट करीत असल्याचा आरोप निराधार आहे.

 

दरम्यान, बंद काळात राडा करणार्‍या युवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत हरभरा घेतलेल्या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शहाद्यात स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या बंदचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...