आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्या\' जिवघेण्‍या हल्ल्याचा ‍तीव्र निषेध, यावलमध्ये तलाठी संघटना, महसूल कर्मचार्‍यांची लेखणी बंद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- अमळनेर येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांचेवर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचा यावल तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व कोतवाल संघटनेने काळया फिती लावून तीव्र निषेध केला आहे. तलाठी संघामार्फत आज (शुक्रवार) लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरास तत्काळ अटक व्हावी या संदर्भात यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

काल (गुरुवार) रात्री 8.00 वाजता पिंगलवाडे (ता.अमळनेर) येथील तलाठी योगेश रमेश पाटील व अमळनेर तालुक्यातील इतर मंडळ अधिकारी तहसिलदार अमळनेर यांचे आदेशान्वये अवैध गौणखणिजला आळा घालण्याकरीता गस्तीवर होते. त्यांना त्यावेळी त्यांना अंचलवाडी ते रणाइचे रस्त्यावर 3 विना परवाना रेती वाहतूक करणारी वाहने आढळून आली. सदर वाहने पथकातील सदस्यांनी ताब्यात घेऊन अमळनेर पोलिस स्टेशन येथे जप्त करण्यासाठी घेऊन जात असताना त्यातील दोन वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर समोर शितल देशमुख, योगीराज चव्हाण, उमेश वाल्हे, श्रीकांत पाटील, शिरीष पाटील व इतर 20 ते 25 लोकांनी अडवून सदर वाहनावर बसलेले तलाठी योगेश रमेश पाटील यांना शिवीगाळ करून सदर वाहने सोडून देण्यास धमकावले. इतकेच नाही तर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलाठी पाटील यांना वाहण्याच्या खाली ओढून लाथा बुक्यानी बेदम मारहाण केली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) यावल तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व कोतवाल संघटनांनी काळया फिती लावून निषेध केला. संबंधीत हल्लेखोरास तत्काळ अटक व्हावी, या संदर्भात यावल तहसिलदार कुंदन हिरे यांना लेखी स्वरुपात निवेदन दिण्यात आले

 

यावेळी जिल्हा तलाठी संघ सरचिटणीस जे.डी.बंगाळे, तालुका अध्यक्ष एम.एच.तडवी, गोपाळ भगत, शरद सुर्यवंशी, व्ही.पी.पाटील, किरण सरदार, बबीता चौधरी, महसुल संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष एस.एस.पाटील, उज्वला हनवते, ए.व्ही.चौधरी, पी. व्ही. भिरुड, आर आय तडवी, तुषार घासकडबी, किरण बावस्कर चतुर्थ कर्मचारी यांचे तर्फे रहेमान तडवी, युनुस खान कोतवाल संघातर्फे पंढरी अडकमोल, सुरेश तायडे आदीचा समावेश होता.

 

आज लेखणी बंद ...
या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटनेने लेखणी बंद आंदोलन केले. जोपर्यंत संबंधीत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत जिल्हाभरात लेखणीबंद आंदोलन सुरुच राहील असा इशारा जिल्हा तलाठी संघटनेचे सरचिटणीस जे.डी.बंगाळे यांनी सांगितले.

 

महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी लेखणी बंद
अवैध गौणखनिज कारवाई करण्यास गेलेल्या एका तलाठीला अशा प्रकारे क्रूरपणे हल्ला केला जातो. तेव्हा प्रशासनात काम करावयाचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा संबंधीत हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही होण्याकरीता महसूल कर्मचारी संघटनेकडून शनिवारपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...