आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन: दुष्काळात मंगरूळच्या शेतकरी दाम्पत्याने टँकरच्या पाण्याने जगवली फुलशेती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- दुष्काळात मंगरूळच्या शेतकरी दाम्पत्याने टँकरने पाणी पुरवठा करून फुलशेती जगविली आहे. यासाठी आतापर्यंत त्यांनी गेल्या तीन चार महिन्यात एक लाख रुपयाचे पाणी झाडांना दिले आहे. त्यामुळे उत्पादन सुरुच आहे.

 

अमळनेर तालुक्यात 35 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे, तर 25 गावांमधील विहिरी अधिग्रहीत आहेत. अशा स्थितीत शेती जगवणे अवघड झाले आहे. पण त्यावर मात करत त्यांनी शेती मात्र फुलवली आहे.

 

पॉली हाऊस'च्या माध्यमातून आधुनिक शेती करण्यासाठी मंगरूळ येथील रहिवासी व सुप्रसिद्ध वकील जगतराव बागुल यांचे चिरंजीव दीपक बागुल व त्यांच्या पत्नी सुषमा दीपक बागुल यांनी हा खटाटोप सुरु ठेवला आहे.

 

अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून दीपक यांनी प्रस्ताव तयार करून सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत 50 टक्के अनुदानावर अर्धा एकर जागेत मंगरूळ शिवारातील पॉली हाऊस उभारले आहे. त्याच्या फुलांची सुरुवात डिसेंबरमध्ये सुरु झाली. पती-पत्नी यांनी प्रशिक्षण घेतले असून त्यामुळे जरबेरा या जातीच्या फुलांची 12 हजार रोपांची लागवड केली आहे. त्यात 6 रंग त्यांनी पुणे येथून मागवले आहेत. पॉली हाऊससाठी लागणारा कापड त्यांनी चक्क इस्रायल या देशात वापरला जाणारे गिनिगर व्हाईट डीफ्युजर नावाचे प्लास्टिक मागवले आहे. त्यामुळे कितीही तापमान गारपीट याला तोड देणारे प्लास्टिक आहे.

 

दररोज सरासरी 1800 फुले यातून मिळतात व ते खोक्यातून मुंबई- इंदूर येथील बाजारात ट्रान्सपोर्टने पाठविली जातात. साधारणतः रुपये 2 रुपये ते 10 रुपये असा भाव बाजारावर अवलंबून असतो.  साधारणतः ही बाग 3 वर्षे नीट निगा ठेवली तर जगते. यासोबत त्यांनी आपल्या शेतातच दोन शेततळे तयार केले आहेत. पण ठणठणाट त्यात त्यांच्या स्वतःच्या 5 हजार लिटर ट्रक्टरच्या 2 टँकरनेपाणी शहरातून विकत घेऊन ते पाणी शेततळ्यात सोडले जाते व तेथून उचलून ते 10 हजार लिटर पाणी या फुलशेतीसाठी फॉगिंग आणि ड्रीपसाठी वापरले जाते. 

 

जळगावच्या उष्ण हवामानात पॉलिहाऊसमध्ये जरबेराची लागवड कशी करावी, त्याची निगा कशी राखावी त्याला लागणारी खते आणि प्रतिबंधक औषधी काय वापरावी याचे नियोजन करत यासाठी पुण्याच्या सल्लागारांकडून मार्गदर्शन घेत आहेत.

 

'मी स्वतः व माझी पत्नी आम्ही दोघांनी जाऊन या शेतीबाबत प्रशिक्षण घेतले आहे. माझी पत्नीही मला या कामात उत्तम सहकार्य करते.त्यामुळे मला इतर बाबींकडे लक्ष देता येते. गेल्या गेल्या सहा महिन्यांपासून पाणी विकत आणून शेती जागवली आहे. एकीकडे गावात व परिसरात प्यायला पाणी नाही अशी स्थिती आहे मात्र आपण निराधार सोडलेला नाही. यंदा कमी उत्पादन मिळेल मात्र पुढे भविष्यात हि बाग सुगीचे दिवस आणू शकते.'
– दीपक जगतरव बागुल, मंगरूळ

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... टँकरच्या पाण्याने फुलशेती जगवणार्‍या शेतकरी दाम्पत्याचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...