आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: रात्रभर आसरा देणाऱ्या मित्राच्याच डोक्यात घातली कुऱ्हाड, मारेकऱ्याचीही आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव / एरंडोल- रात्र घालवण्यासाठी आश्रय देणाऱ्या मित्राच्याच डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उत्राण (ता.एरंडोल,जि.जळगाव) येथे घडला. त्याच्या बचावासाठी आलेली मित्राची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या डोक्यावरही मारेकऱ्याने वार केले आणि त्यानंतर तीन किलोमीटर लांब पळून जात धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मारेकऱ्यानेही आत्महत्या केली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे हत्याकांड झाल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. 


सुकलाल रिया भिलाला (३८) असे मृत शेत मजुराचे नाव आहे. तो पक्षाघाताचा रुग्ण होता. मित्र ज्ञानसिंग पालसिंग पावरा (३८) याने सुकलालची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मृत सुकलालची पत्नी कारू (३२), मुलगी सीमा (११) व मुलगा गोविंद (७) हे तिघे गंभीर जखमी आहेत. मध्य प्रदेशातील इंदवी येथील भिलाला कुटुंबीय दोन वर्षांपासून उत्राण येथील राजेंद्र पाटील यांच्या निंबूच्या मळ्यात मजुरी करत अाहेेत. गावालगत असलेल्या अहिर हद्द येथे हे शेत असून शेतालगतच एका खोलीत भिलाला कुटुंबीय राहतात. तर ज्ञानसिंग हा सुकलालचाच समाजबांधव व मित्रदेखील हाेता. तो उत्राणजवळील भातखंडे (ता. भडगाव) येथील ज्ञानदेव महाजन यांच्या शेतात कामाला होता. 


दारूच्या व्यसनामुळे महाजन यांनी कामावरून काढून टाकल्यामुळे बुधवारी दुपारी ज्ञानसिंग त्याचे सर्व सामान घेऊन सुकलालच्या घरी आला. रात्रभर थांबून नंतर दुसरीकडे काम बघण्याच्या उद्देशाने त्याने सुकलालकडे मुक्काम करण्याची योजना आखली होती. मित्र असल्याने सुकलालनेही त्यास घरी ठेऊन घेतले. बुधवारी मध्यरात्री दोघांनी मद्यपान केले. यानंतर दोघांत झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ज्ञानसिंगने घरात असलेल्या कुऱ्हाडीने सुकलालच्या डोक्यावर जबर वार केला. यात तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. त्याला रोखण्यासाठी आलेल्या कारू, सीमा व गोविंद यांच्याही डोक्यात त्याने वार केले. या मारहाणीत सुकलालचा जागीच मृत्यू झाला. तर कारू, सीमा व गोविंद हे बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 


नाईट ड्यूटीवर गेल्याने थोरला मुलगा बचावला 
सुकलालचा थोरला मुलगा रतन रात्री कामावर गेला होता. तो गुरुवारी पहाटे ५ वाजता कंपनीतून घरी आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुटुंबीय पाहताच त्याला धक्का बसला. त्याने गावाकडे धाव घेऊन पोलिस पाटलांना घटना सांगितली. पाटलांच्या माहितीवरून कासोदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन भिलाला यांचा मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. तर जखमी कारू, सीमा व गोविंद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे. 


मारेकरी रेल्वे रुळावर मृतावस्थेत अाढळला 
एरंडाेल तालुक्यात या घटनेने गुरुवारी सकाळपासून खळबळ उडाली. सकाळी ८ वाजता ज्ञानसिंगचा मृतदेह उत्राण पासून ३ किमी अंतरावर असलेल्या परधाडे येथील रेल्वेरुळावर आढळून आला. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. ज्ञानसिंग हा रात्री सुकलालच्या घरी थांबला होता. त्यानेच हे हत्याकांड घडवून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून उत्राणच्या गावकऱ्यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


भावाचा डोक्यात घण घालून भावाकडूनच खून 
सोलापूर- शेतगड्याला मारहाणीस विरोध केल्याने मोठ्या भावाने झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घण घालून त्याची हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील हत्तीज येथे गुरुवारी उघडकीस आली. सूरज सूर्यकांत जाधव (२६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ सुहास सूर्यकांत जाधव (३१) याला अटक करण्या आली. 


सुहास हा आई, वडील, पत्नी, मुले आणि लहान भाऊ सूरज यांच्यासह हत्तीज येथे राहतो. सुहासचा शेतमजुरावर सूरजशी वाद झाला होता. यातूनच त्याने लहान भावाचा काटा काढला. 

 

पुढील स्लाइड्‍सअर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...