आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमधील तीन मित्रांचा तापी नदीत बुडून मृत्यू, गुजरातमधील घटना, दोघे एकुलते एक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- धू‍लिवंदनच्या (दि.2) दिवशी तालुक्यातील गिरडगाव येथील दोन तर किनगाव येथील एका तरूणाचा गुजरात राज्यातील बौधान गाम (ता. मांडवी जि. सुरत) येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाला होता त्याचा मृतदेह शनिवारी गावात आणण्यात आले. ‍तिथे शोकाकूल वातावरणात दोघांवर गिरडगाव तर एकावर किनगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.


मुळ गिरडगाव येथील रहिवासी शशीकांत मोतीराम पाटील (वय-27) व डिगंबर पुडंलिक पवार (वय-25) आणि किनगाव येथील रहिवासी श्रीराम संतोष पाटील (वय-24) हे तिघे सुरत (गुजरात) संगम सोसायटी भेस्तान येथे राहत होते. त्या भागात ते कंपनीत कामाला होते. शुक्रवारी धूलिवमीची सुटी असल्याने ते तापी नदी काठच्या बौधान गाम ता. मांडवी जि. सुरत येथे गलतेश्वर महादेव मंदिरात रंगोत्सवाचा मोठा मेळा लागतो तेथे ते रंगपंचमी खेळण्यास गेले होते तेथे खुपचं गर्दी असल्याने ते जवळचं असलेल्या शानेश्वर महादेव मंदिरावर गेले व दर्शनापुर्वी तीघं तापी नदी पात्रात अंघोळीला पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीघांचा बुडून मृत्यू झाला या दुर्घटनेची माहीती तेथील नजीकच्या मांडवी पोलिसांना देण्यात आली तेथे पुरूषोत्तम मुरलीधर पाटील भेस्तान सोसायटी सुरत मुळ रहिवासी पाचोरा जि.जळगाव यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली व शनीवारी तीघांचे मृतदेह गावी आणण्यात अाले सकाळी ९.३० वाजेेला शशीकांत पाटील व डिंगबर पवार यांच्यावर गिरडगाव येथे तर श्रीराम पाटील याच्यावर किनगावात शोकाकुल वातावरणात अंतविधी करण्यात आले.

 

दोघं एकुलते एक..
शशीकांत पाटील हा विवाहित होता त्या पश्चात एक अविवाहित बहिण, पत्नी, एक दोन वर्षाचा मुलगा व वृध्द आई, वडील आहे.तर डिंगबर पवार हा यांचे पश्चात वडील पुंडलीक पवार यांचे कर्करोगाची मोठी शस्त्रक्रीया झाली व वृद्ध आई आहेे तीन बहिणी असून त्या विवाहीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...

बातम्या आणखी आहेत...