Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra

पूर्णा नदीच्या पुलावर 'सेल्फी'च्या नादात वाहून गेलं अख्ख कुटुंब; गेले होते गजानन महाराजांच्या दर्शनाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 06:32 PM IST

गजानन महाराजांचे शेगावी दर्शन घेऊन कुटुंबासह जळगाव जामोद येथे परत जात असतांना खिरोडा पुलावर चव्हाण कुटुंब थांबले.

 • Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra

  बुलढाणा- शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कुटुंबासह जळगाव जामोद येथे परत जातांना खिरोडा पुलावर चव्हाण कुटुंबावर काळाने झडप घातली. यावेळी सेल्फीच्या नादात असतांना चव्हाण कुटुंबातील तिघे वाहुन गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजता घडली. एक मृतदेह गुरुवारी सकाळी शेगाव तालुक्यातील भास्तन गावाजवळ सापडल्याची माहिती मिळाली आहे. दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

  मिळालेली माहिती अशी की, कवठा बहादुरा येथील रहिवाशी व सध्या जळगाव जामोद येथे वास्तव्यास असलेले चव्हाण कुटुंब शेगाव येथील गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन जळगाव जामोद येथे परत जात होते. जळगाव जामोद येथील बुलढाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत असलेले राजेश चव्हाण यांच्यासह पत्नी आणि मुलाचा यात समावेश आहे.

  राजेश चव्हाण (42) हे बुधवारी सायंकाळी पाच वाजता शेगाव-वरवंट बकाल मार्गावरील खिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलावर पोहोचले. त्यांच्यासोबत पत्नी सरिता (39) आणि मुलगा श्रावण (13) होता. श्रावण पुलावर सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरुन तो थेट नदी पात्रात पडला. मुलाला पकडण्यासाठी सरिता धावल्या असता त्याही तोल जाऊन नदीत पडल्या. नंतर पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी राजेश चव्हाण यांनी नदीत उडी घेतली. मात्र, नदीला पूर असल्याने तिघेही वाहून गेले आहेत. सरिता चव्हाण यांचा मृतदेह शेगाव तालुक्यातील भास्तन येथे सापडल्याची माहिती मिळाली आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 • Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra
 • Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra
 • Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra
 • Three people swept away in flash flood in Buldana Khiroda maharshtra

Trending