आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणारी कलश यात्रा महाराष्‍ट्रात, अनुयायींना घेता येईल दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/धुळे- अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे विचार आणि सेवा संदेश देणारी त्यांची कलश यात्रा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पोहोचली आहे. इंदूर येथील सूर्योदय आश्रमातून गुरुवारी (5 जुलै) शेकडो अनुयायींच्या उपस्थितीत कलश यात्रा रवाना झाली होती.

 

दर्शन रथात चरण स्मृती, अस्थि कलश, गुरु आसन, गुरु पादुका, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ आदी ठेवण्यात आले आहे.

 

इंदूरहून निघालेल्या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिला जात आहे. अनुयायींनी रोपटे दिले जात आहेत. यात्रा मार्गात शेतकर्‍यांना बियाणे देण्यात येणार आहे. ही यात्रा इंदूरहून सेंधवा, शिरपूर , धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, शिर्डी, नाशिक, मुंबई, पुणे, इंदापूर, नीमगाव, बारामती, वाई, पाचगणी, सातारा, पाटण, कराड, कोल्हापूर, सांगली, सांगोला, पंढरपूर, खडी, सोलापूर, तुलजापूर, उस्मानाबाद, परंडा सोनारी, कर्जत कोपर्डी, अहमदनगर बीड, अंबाजोगाई, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, चाळीसगाव, जळगाव, वरणगाव, चोपड्याहून 27 जुलैला गुरु पौर्णिमाला परत इंदूर येथे येणार आहे.

 

संस्था सचिव तुषार पाटील यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील विविध नद्यांचे पाणी, धार्मिक स्थळांवरील माती एकत्रित कणण्‍यात येणार आहे. पवित्र जल आणि मातीतून भय्यू महाराज यांची समाधी बांधण्यात येणार आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... भय्यू महाराजांच्या अंत्ययात्रेचे फोटो...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...