आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला; शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या चालकाला बाहेर काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- भुसावळ रस्त्यावरील अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावरून ट्रक नदी पात्रात कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले.

 

शनिवारी (ता.7) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. तहसीलदार कुंदन हिरे यांनी स्वत: मदतीला धावून आले. त्यांनी जखमी चालकाला शासकिय वाहनात बसवून भुसावळ नगरपालिका रूग्णालयात दाखल केले.


यावलकडून भुसावळकडे फरशी व स्टाइल घेवून ट्रक निघाला होता. अंजाळे (ता.यावल) गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून जातांना वळणाचा अंदाज न आल्याने थेट ट्रक नदीपात्रात कोसळला. या अपघातात चालक हबीब शेख (रा.उदगीर,जि.लातुर) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी अंजाळे येथील कैलास सपकाळे, उपसरपंच धनराज सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश साळुंके आदी नागरीकांच्या मदतीने आधी रस्ता मोकळा केला व जखमींस ट्रकमधून काढण्यास मदत केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा अपघाताचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...