आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • बोदवड तालुक्यात वीज पडून दोन ठार, तीन जखमी Two Death By Lightning In Bodwad Taluqa Jalgaon

बोदवड तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी, महिलेला जळगावला हलवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड- तालुक्यात वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही घटना आज (शनिवार) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडल्या.

 

जितेंद्र सुभाष माळी (वय 24, रा.शेलवड) आणि शंकर प्रभाकर वाघ (वय-35,रा. सुरवाडा खुर्द) या दोघांचा मृत्यू झाला. सोनाली नीलेश माळी (वय-22, रा.शेलवड), सुरज विजय वाघ (वय-12), मोहन नारायण सोनवणे हे तिघे जखमी झाले आहे. सोनाली माळी यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगाव जिल्हा रुग्‍णालयात हलवण्यात आले आहे. सुरज वाघ याचा पाय भाजला गेला असून मोहन सोनवणे याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...