आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्याच्या लग्नात घनश्याम अग्रवालांकडून वडिलांच्या स्मरणार्थ 2 मोफत पाणी टँकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- शहरातील भाजप नेते घमश्याम अग्रवाल यांनी दि १५ मार्च रोजी वडील ओंकारलाल गौरीलाल अग्रवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ पुतणे चि.प्रियेश व वधू राणी कोमल यांच्या लग्नाच्या दिवशी आई श्रीमती कमलादेवी अग्रवाल यांच्या हस्ते पालिकेचे गटनेते जीवन चौधरी यांच्या हातात ट्रॅक्टरची चावी देऊन शहराला ऐन उन्हाळ्यात मोफत पाणी पुरवठा व्हावा म्हणून दोन टँकर देऊन घनश्याम अग्रवाल यांनी स्वतः पदरमोड करून दोन टँकर दिले आहेत.

 

काल संध्याकाळी अकुलखेडा ता चोपडा येथे घनश्याम अग्रवाल यांचे पुतणे श्रीकांत अग्रवाल यांचे चिरंजीव चि प्रियेश अग्रवाल यांचा विवाह पार पाडला. या विवाहची आठवण व्हावी व वडिलांचे पुण्यस्मरणार्थ शहराची सामाजिक बांधीलकी या नात्याने घनश्याम अग्रवाल यांनी शहरात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता काल मोफत पिण्याचे पाण्याचे दोन टँकर दिल्याने शहरात मोठी अडचण दूर होणारी आहे.

 

श्रीमती कमलादेवी अग्रवाल यांच्या हस्ते टँकर ची चावी गटनेते जीवन चौधरी यांनी स्वीकारली. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे,भाजप नेते घनशयम अग्रवाल,सरोजअग्रवाल,करण अग्रवाल,राष्ट्रवादी युवा नेते आशिष गुजराथी,चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, सुतगीरणी संचालक शशिकांत पाटील,भाजप चे सागर पठार,पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटिल,नायब तहसीलदार डॉ स्वप्नील सोनवणे,डॉ विकास हरताळकर,डॉ विजय पोतदार,अशोक अग्रवाल,पवन अग्रवाल,विपुल अग्रवाल व अग्रवाल परिवार हजर होते.

 

भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांनी नुकतेच काही महिन्यापूर्वी ना गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या फैजपूर येथील महाआरोग्य शिबिरात दीड लाख लोकांनी अन्नदान केले होते,तर शहरतील  व तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळा मध्ये वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ भरीव अशी मदत त्यांनी केली होती.गरिब व गरजू शालेय मुलांसाठी दरवर्षी भरीव मदत देऊन आपलं सामाजिक कार्य पार पाडत असतात.

 

जो मागेल त्याला ह्या पिण्याचे पाण्याचे टँकर विनामूल्य दिले जाणार असून ज्या ठिकाणी खरोखर पाण्याची अडचण आहे त्या भागातील रहिवाशांना टँकर पंकज नगर या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...