आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT थांबेना..ट्रकचे मागचे चाक डोक्यावरुन गेल्याने बहीणीचा मृत्यू, भाऊ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनलेला आहे. यात शिव कॉलनी स्टॉप हा सर्वाधिक धोकेदायक अपघात स्थळ बनले. या ठिकाणी शनिवारी दुपारी दीड वाजता साईडपट्टीवरुन मोपेड दुचाकी घसरुन ट्रकला धडकली. यात दुचाकीवर भावाच्या मागे बसलेली त्याची बहीण रस्त्याच्या मधोमध फेकली गेली. त्यामुळे ट्रकचे मागची दोन्ही चाके महिल्याच्या डोक्यावरुन गेल्याने ती जागीच ठार झाली. तर दुचाकीस्वार जखमी झाला. डोळ्यासमोर बहिणीचा मृत्यू पाहिल्याने भावास मोठा धक्का बसल्याने ते काही वेळ रस्त्यावर सुन्न अवस्थेत बसले होते.

 

सुरेखा सुभाष सनेर (वय-43, रा.श्रीराम समर्थ कॉलनी, खोटेनगर) असे मृत महिलेच तर विकास भटू सोनवणे (वय-41) हे अपघातात जखमी झाल्याचे नाव आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर सुरेखा ह्या मुलगी गायत्री (वय-20) हिच्यासह मोठे भाऊ विकास सोनवणे (वय-47) व राहूल सोनवणे या दोन्ही भावंडांकडे राहत होत्या. विकास हे एमएसईबीमध्ये तर राहूल हे पिंप्री (ता.धरणगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. शनिवारी विकास व सुरेखा हे दोघे दुचाकीने (क्रमांक एमएच-19, एएस, 0408) बाजारात गेले होते. यानंतर शिव कॉलनी परिसरात एका रुग्णालयात सुरेखा यांच्या हातावर उपचारही केले. कामे आटोपल्यानंतर दोघे जण घरी जाण्यास निघाले. शिव कॉलनी स्टॉपवरील उताराजवळ विकास सोनवणे हे दुचाकी महामार्गावर चढवण्याचा प्रयत्न करताच धोकादायक साईडपट्टीवरुन त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी खाली पडत असताना विकास हे मागून येणाऱ्या ट्रकच्या (क्रमांक आरजे- 07, 6571) मागच्या टायरजवळ धडकले. त्यामुळे ते दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यात दुर्देवाने सुरेखा सनेर ह्या थेट रस्त्याच्या मधोमध पडल्या. याच वेळी त्यांच्या डोक्यावरुन ट्रकचे मागची दोन्ही चाके गेल्याने डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हे दृष्य पाहून विकास यांना जबरदस्त धक्का बसला. काही वेळ त्यांना काहीच उमजत नाही. नागरिकांनी त्यांना रस्त्यापासून काही अंतर लांब नेऊन खाली बसवले. घटना पाहून ते कोणाशीच काहीच बोलत नव्हते. धक्क्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. मित्र, नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेऊन उपचार केले. तर सुरेखा यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाठलाग करुन ट्रकचालकास पकडले....
अपघातानंतर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील काही नागरिकांनी पाठलाग करुन त्यास मानराज पार्क परिसरात पकडले. रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करुन चालक पळून जात असताना त्यास काही तरुणांनी पकडून ठेवले. राजस्थान येथून मठ घेऊन हा ट्रक जळगावात आला होता. शनिवारी सकाळी एमआयडीसीमधील एका कंपनीत काही माल उतरवल्यानंतर दुपारी गुजराल पेट्रोलपंप मार्गाने शिवाजीनगरात ट्रक जाणार होता. तत्पूर्वी शिव कॉलनी स्टॉपवर हा अपघात झाला.

 

रुग्णवाहिका न मिळल्याने मालवाहून रिक्षातून आणला मृतदेह...
4 जुलै रोजी अजिंठा चौफुली येथे सुरेश मराठे या माजी सैनिकाचा अपघात झाला होता. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे मराठे यांचा मृतदेह सुमारे 45 मिनीटे रस्त्यावर पडून होता. त्यानंतर मालवाहू रिक्षातून त्यांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. त्याच प्रकारे शनिवारी सुरेखा यांचा मृतदेह देखील 40 मिनीटे रस्त्यावर पडून होता. या वेळी देखील मालवाहू रिक्षातून मृतदेह रुग्णालयात आणावा लागला. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस उप निरीक्षक रोहिदास ठोंबरे, शरद पाटील, प्रदीप चौधरी, वाहतूक शाखेचे अशोक महाजन, राजेंद्र उगले यांच्यासह पथकाने वाहतूक सुरळीत केली. परिसरातील नागरिक शक्ती महाजन, सागर पाटील आदींनी मृतदेह रिक्षात ठेऊन रुग्णालयात आणला.

 

नोकरी शोधण्यासाठी मुलगी गेली होती पुण्याला...
मृत सुरेखा यांची मुलगी गायत्री ही दोन महिन्यांपासून पुण्याला गेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधासाठी ती पुण्यातील नातेवाईकांकडे थांबली आहे. तिला अपघाताची माहिती दिल्यानंतर ती जळगावात येण्यासाठी निघाली होती. विकास सोनवणे, राहुल सोनवणे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड आक्रोश केला. पतीपासून विभक्त असलेल्या सुरेखा यांची गायत्री ही एकुलती मुलगी आहे.

 

‘मी अपराधी ठरलो..., मला आईजवळ नेऊ नका’; विकास सोनवणेंचा आक्रोश......
19 वर्षांपासून सुरेखा व त्यांची मुलगी ह्या भाऊ विकास व राहुल यांच्याकडे राहत होत्या. दोन्ही भावाचा बहिण व भाचीवर प्रचंड जीव होता. बहिणीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर विकास सोनवणे यांना धक्का बसला. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी प्रचंड आक्रोश केला. ‘मी तिचा अपराधी ठरलो... मला आईकडे घेऊन जाऊ नका, तिला काय तोंड दाखवू, माझी म्हातारी आई मरुन जाईल... देवाने त्या पोरीला आई पण ठेवली नाही...’ ही त्यांची वाक्ये मन हेलावून टाकणारा होती. ‘मीच बहिणीचा अपराधी ठरलो असल्यामुळे घरी जाणार नाही’ असे बोलत त्यांनी घरी जाण्यास नकार दिला होता. मित्रांनी त्यांची समजून काढून रिक्षातून त्यांना घरी नेले. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून घटनेबद्दल माहिती दिली.

 

साईडपट्ट्या उठल्या जीवावर
पावसाळ्यामुळे महामार्गावरील साईडपट्ट्यांवरील मुरूमाचा थर वाहून गेला आहे. त्यामुळे साईडपट्ट्यांची खोली वाढली आहे. अशा धोकादायक स्थितीत दुचाकी रस्त्यावर चढवणे व उतरवणे अत्यंत कठीण झाले आहे. 4 जुलै रोजी याच कारणामुळे अजिंठा चौफुलीवर सुरेश मराठे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील साईडपट्ट्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...