Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Yawal Bandh Live Updates Maharashtra Bandh For Maratha Reservation

मराठा आंदोलकांनी यावलमध्ये आमदार हरिभाऊ जावळेंचे भाषण उधळून लावले..केली राजीनाम्याची मागणी

प्रतिनिधी | Update - Aug 09, 2018, 07:41 PM IST

आंदोलकांना मार्गदर्शन करण्यास आलेल्या आमदार हरिभाऊ जावळेंना आंदोलकांनी आधी राजीनामा द्या, नंतर तुमची भूमिका स्पष्ट करा,

 • Yawal Bandh Live Updates Maharashtra Bandh For Maratha Reservation

  यावल- आदिवासी अस्मिता दिनाचा जिल्ह्याचा कार्यक्रम यावलला असल्याने मराठा समाज बांधवांनी दुपारनंतर रास्तारोको व शहर बंद हाक दिली. व्यावसायिकांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवली तर मुस्लिम बांधवांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊ समर्थन दिले तसेच रास्तारोको करीता महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या. दुपारनंतर एसटी महामंडळासह शहरातील सर्वच व्यवहार ठप्प होत झाले. आंदोलकांना मार्गदर्शन करण्यास आलेल्या आमदार हरिभाऊ जावळेंना आंदोलकांनी आधी राजीनामा द्या, नंतर तुमची भूमिका स्पष्ट करा, अशा घोषणा देत त्यांचे भाषण उधळून लावले.

  यावल तालुका बहुल आदिवासी असल्याने आणि गुरूवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जिल्हयातील आदिवासीं बांधवाची शहरात सांस्कृतिक व पारंपरिक भव्य रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. मराठा समाजाच्या वतीने दुपारी दोन वाजेपासून बंदचे नियोजन केले होते. शहरातील बाजारपेठ बंद होती. मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात मागील वर्षी 58 मोर्चे शांततेत पार पडले. तसेच मागील 15 दिवसांपासून राज्यभर समाज बांधव ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. तरीही शासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने समाजाच्या तीव्र भावना आहेत. राज्यभरात आंदोलकांवर ठिकठिकाणी दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे, पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांना समाजातील लहान मुलींच्या हस्ते देण्यात आले. उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अतुल पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील किनगावकर, देवकांत पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्त्वच केले होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सदस्य रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, पंचायत समीती उपसभापती उमाकांत पाटील, अनिल साठे, देविदास पाटील, दीपक पाटील, यांचेसह तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव व महीला मोठया संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी समाजाच्या व्यथा सांगून आरक्षणाची गरज व्यक्त केली.

  आमदार जावळे यांचे भाषणात गोंधळ
  आंदोलनस्थळी आमदार हरीभाऊ जावळे आले असता ते ज्या मतदार संघाचे नेतृत्त्व करत आहेत त्या रावेर-यावल मतदार संघात सुमारे 50 हजार मराठा मतदार आहेत. तेव्हा आरक्षणाबाबत आपली भूमिका आमदार जावळे स्पष्ट करीत असतांना आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या व आधी आमदारांनी राजीनामा द्यावा व मगच भूमिका स्पष्ट करावी, यासह 'जय जिजाऊ-जय शिवराय'च्या जोर-जोरात घोषणा दिल्याने आमदार जावळे यांनी समाजाची भूमिका मुख्यमंत्री यांचेकडे मांडत असल्याचे सांगून आंदोलनाला गोंधळातच पाठींबा जाहीर केला व तेथून लगेच निघून गेले.

  पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा समाजाच्या चरणी अर्पण व या राजीमान्यावर समाज बांधवांनी अंतिम निर्णय घ्यावा असे सांगीतले. या आंदोलनामुळे यावल एसटी आगाराच्या सर्वच 300 फेऱ्या रद्द झाल्या. सहा लाखांचे उत्पन्न बुडाले. तसेच बाजारपेठ बंद असर्ल्याने व्यवहार ठप्प झाले. त्यात केळी व्यापार, विविध व्यवसाय बंद राहिल्याने कोट्यवधी रूपयांचा व्यवहार ठप्प झाला होता.

  विविध समाजाचा पाटींबा
  प्रसंगी मराठा समाजास त्वरीत आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने तहसीलदार हिरे यांना दिले. तर कोळी समाजाच्या वतीने जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर सोनवणे यांनी तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी चौधरी परीवार मराठा समाजासोबत असल्याचे जाहीर केले.

  मुस्लिम समाजाच्या वतीने पाणपोई
  आंदोलाकसाठी मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केली होती. मुस्लम समाजाचे गनीखान अयुबखान, करीम मन्यार, नगरसेवक शेख असलम शेख नबी, हबीब मंजर, कदिरखान, एजाज पटेल,शेख अलीम शे. रफीक, शे. अजहर,अशपाका शहा, मोहसीन कुरेशी, अयुबखान यांचेसह अनेक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यावल येथे आमदार जावळे यांच्या भाषणादरम्यान झालेल्या गोंधळाचे फोटो...

 • Yawal Bandh Live Updates Maharashtra Bandh For Maratha Reservation
 • Yawal Bandh Live Updates Maharashtra Bandh For Maratha Reservation

Trending