आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यावल- नगरसेवक अतुल पाटील यांच्या माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी प्रकरणी खंडणी मागणाऱ्या नगरसेवक सुधाकर धनगर यांना कोर्टाने 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती.
मात्र, आरोपीच्या वकीलांनी लागलीच जामिनाकरीता कोर्टात अर्ज केला. जामीन अर्जावर दुपारी साडेचार वाजता सुनावणी झाली. आरोपी सुधाकर धनगर यास कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर सुधाकर धनगर यांची मुक्तता करण्यात आली आहे.येत्या 26 मार्च रोजी पुढील सुनावणी आहे.
काय आहे हे प्रकरण..?
नगरसेवक अतुल पाटील सह माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या उद्देशाने नगरसेवक सुधाकर धनगर यांनी एक क्लिप तयार केली होती व ती व्हायरल न करण्याकरीता त्यांनी अतुल पाटील 50 हजाराची खंडणी मागीतली होती. या प्रकरणी शनीवारी रात्री खंडणीसह विविध कलमान्वये नगरसेवक सुधाकर धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व रविवारी पहाटे औरंगाबाद येथील धनगर यांच्या निवासस्थानावरून त्यांना अटक केली होती तर सोमवारी त्यांना दुपारी दोन वाजेला येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश डी. जी. जगताप यांच्या समोर उभे केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याने कोर्ट व परिसरात मोठी गर्दी जमली होती. आरोपीकडून जळगाव येथील अॅड. सागर चित्रे यांनी युक्तीवाद केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.