आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेखाली आल्याने शरीरापासून धड झाले वेगळे; नाव, पत्ता सांगून त्याने सोडला प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- नंदुरबार रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या डब्याखाली एकाने स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर पाच मिनिटे ताे जिवंत हाेता. घटनास्थळी त्वरित दाखल झालेल्या पोलिसांना त्याने स्वत:चा पत्ता व नाव सांगितले. त्यानंतर त्याने जीव साेडला. 


नंदुरबार रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एक व दोनच्या मधल्या रुळावरून सोमवारी सकाळी ११.३० मालगाडी निघाली. गाडीचा वेग कमी होता. अचानक ३९ वर्षीय संजय मराठे याने रेल्वेखाली स्वत:ला झाेकून दिले. त्यात त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. गाडी रेल्वे रुळावरून पास झाल्यानंतर प्रवाशांनी आरडा ओरड करायला सुरूवात केली. रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या सहायक फाैजदार गोविंद काळे, हेडकॉन्स्टेबल सुरेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल खिरटकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी देह पालथा पडला होता. त्याचा देह संजय सोनवणे या मदतनीसाच्या सहाय्याने उचलण्यात आला. तोपर्यंत त्याच्या शरीरात प्राण होता. 


मेंदूत रक्तपुरवठा हाेईपर्यंत शरीरात प्राण असताे 
मानवाच्या शरीरात पायापासून मेंदूपर्यंत रक्तपुरवठा हाेत असताे. शरीराचे दाेन तुकडे झाल्यानंतरही रक्तपुरवठा व अाॅक्सिजनचा पुरवठा मेंदूत असेपर्यंत व्यक्ती जिवंत असते. परंतु हा कालावधी तीन-चार मिनिटांपेक्षा जास्त असू शकत नाही. 
- डाॅ.भास्करराव खैरे, अधिष्ठाता, जळगाव 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मालगाडीखाली 2 तुकडे झाल्यानंतरही बोलत होता तरुण... (कृपया...कमकुवत हृदय असणार्‍यांनी पाहू नये हा VIDEO)

बातम्या आणखी आहेत...