आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांना पाहून कुणी कपाटात तर कुणी शाैचालयात लपले, २३० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पोलिसांनी मंगळवारी रात्री एकाच वेळी संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात ९ गुन्हेगारांना विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात अाले. त्यांच्याकडून ४ तलवारी, ३ चॉपर, १ कुकरी जप्त करण्यात आले आहे. तसेच पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३०० पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्रभरातून २३० गुन्हेगार, हिस्ट्रीशीटरांच्या घरांची झाडाझडती घेतली, यात पाेलिसांना पाहून कुणी कपाटात तर कुणी शाैचालयात लपले हाेते, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 


कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी हद्दपारी आरोपींचा शोध घेतला. गेल्या ७ वर्षांपूर्वी विविध गुन्ह्यामध्ये सहभागी २३० गुन्हेगार, हिस्ट्रीशीटरांची यादी निश्चित करुन त्यांच्या घरी जाऊन झडती घेतली. अवैध मद्य विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसह मद्यसाठा जप्त करण्यात अाला. 


येणाऱ्या काळात शहरात सण-उत्सव आहेत. चार महिन्यांनी पालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुरक्षा अबाधीत रहावी यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने बुधवारी रात्री एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह व पोलिस उप अधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह मंगळवारी रात्री १२.३० वाजता तपासणीस सुरुवात केली. सकाळी ६.३० वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती. यात क्युआरटी व आरसीपीची प्रत्येक दोन पथकही होते. 


हद्दपार आराेपीस कपाटात लपवले 
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायसोनीनगर येथे राहणारा तथा हद्दपार आरोपी पोेपटकर हा बेकायदेशीरपणे शहरात येऊन राहत होता. कोम्बिंग ऑपरेशनचे पथक त्याच्या घरी गेले असता कुटुंबियांनी त्याला एका कपाटात लपवले. संशय येऊ नये म्हणून या कपाटाच्या बाहेर पंखा उभा केला. पोलिसांना काही वेळानंतर संशय आल्याने त्यांनी कपाट उघडून तपासले असता त्यात पोपटकर असल्याचे समोर आले. याच प्रकारे शनिपेठ भागात काही संशयित शौचालयात लपून बसले होते. तसेच दोन गुन्हेगारांनी पिस्टलच्या आकाराचे लायटर सोबत ठेवले होते. पोलिसांनी हे लायटर जप्त केले. 


सहा ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी 
शहर पोलिस ठाणे :
राकेश पाटील (वय २३) व संदीप निकम (दाेघे रा.गेंदालाल मील) यांच्याकडून प्रत्येकी १ तलवार जप्त केली. संदीप याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर राकेश याच्याकडून १९७६ रूपयांच्या अवैध दारूच्या बाटल्या व अजीज खान (वय ३२, रा.गेंदालाल मील) याच्याकडून लोखंडी कुकरी जप्त केली. 

शनिपेठ पोलिस ठाणे : तिलक सारसर (वय ३०, रा.गुरूनानकनगर) याच्याकडून कोयता तर रणजीत सूर्यवंशी (वय २८, रा.वाल्मीकनगर) व पंकज चौधरी (वय २१, रा.चौघुले प्लॉट) याच्याकडून प्रत्येकी १ चॉपर जप्त करण्यात आला अाहे. 
रामानंदनगर पोलिस ठाणे : फारुख शेख बिस्मिल्ला (रा.पिंप्राळा हुडको) याच्याकडून लोखंडी सुरा जप्त केला. तर हद्दपार संशयित संजय पोपटकर याला अटक केली. 
एमआयडीसी पोलिस ठाणे : गोपाल बाटुंगे (रा.कंजरवाडा) व रिजवान शेख गयासोद्दीन (वय १९, रा.बिस्मिल्ला चौक, तांबापुर) यांच्याकडून प्रत्येकी एक तलवार जप्त केली. तर मुजमीर शेख इस्माईल शेख (वय २२, रा.डाणपुरा, ता.यावल) याच्याकडे चाव्यांचा गुच्छा मिळून आला. घरफोडीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. यानंतर पहाटे कंजरवाडा भागात शिऊबाई अनिल गारुंग, प्रेमाबाई गजमल घमंडे, निलीन बरजु नेतलेकर, गीता राकेश बागडे, उषा नंदू बागडे, शशी प्रताप बागडे, अनिता शाम गारुंगे, गुड्डुबाई राकेश गारुंगे, उषा यशवंत गारुंगे, रवी शिवलाल बाटुंगे, गोविंदा गणेश बागडे यांच्याकडून २६ हजार ८०० रूपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. 


पाहिजे असलेले संशयित सापडले 
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अजामीन पात्र वॉरंटमधील १९, पाहिजे असलेले संशयित १२, तडीपार प्रकरणात परवानगी विना शहरात प्रवेश केलेले २, जमाव बंदी निर्देशाचे उल्लंघन केलेले २ व प्रतिबंधात्मक कारवाई केलेले ११ संशयित मिळून आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...