आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल: धान्‍यात अळ्या, किडे आढळल्‍या प्रकरणी मुख्‍यध्‍यापकांना नोटीस, शाळेने चौकशी अधिका-याचाच केला सत्‍कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल-  लातुरात जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेतील 150 विद्यार्थ्‍यांना मध्‍यान्‍ह भोजनातून विषबाधा झाल्‍याचे प्रकरण ताजे असतानाच जळगावमधील यावल येथेही नगरपालिकेच्‍या शाळेत मध्‍यान्‍ह भोजनासाठी साठवण्‍यात आलेल्‍या धान्‍यात अळ्या व कीडे आढळले आहेत. याप्रकरणी शहरातील साने गुरूजी माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या मुख्‍यध्‍यापकांना नोटीस बजावण्‍यात आली आहे.

 

विशेष म्‍हणजे चौकशी करण्‍यासाठी आलेल्‍या अधिका-याचाच शाळेने एक कार्यक्रम घडवून आणून यावेळी सत्‍कार केला. त्‍यामुळे शाळेतील हा गैरप्रकार अधिका-याच्‍या आदरातिथ्‍याखाली दाबला तर जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित आहेत.  


बुधवारी (4 जुलै) पालिकेच्‍या शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन, गटनेता राकेश कोलते यांनी शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी आणलेल्या धान्याची पाहणी केली, तेव्‍हा हा प्रकार समोर आला. याबात त्‍यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत आज गुरूवारी शोलेय पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी शाळेच्‍या संपुर्ण धान्‍यसाठ्याची तपासणी केली. यादरम्‍यान त्‍यांना 1 क्विंटल तांदळात मोठया प्रमाणात अळ्या व किडे आढळून आले. विद्यार्थ्‍यांच्‍या आहाराच्‍या धान्‍याकडे अशाप्रकारे दुर्लक्ष केल्‍याप्रकरणी त्‍यांनी मुख्‍याध्‍यापक टी. सी. बोरोले यांना ताबडतोब नोटीस बजावली. तर हा जुना साठा असल्याने त्यात अळ्या व धनुर किड लागल्याचे मुख्यध्यापकांनी सांगितले. यावर नगरसेविका रख्‍माबाई भालेराव यांनी हा प्रकार म्‍हणजे विद्यार्थ्‍यांच्‍या जीवाशी खेळ असल्‍याची संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. 


चौकशी अधिका-याचाच शाळेने केला सत्‍कार, 'ऑल ईज वेल'वर शिक्‍कामोर्त‍ब?   
चौकशीकरीता आलेल्या गणेश शिवदे यांचा या वेळी एक कार्यक्रम घडवून शाळेकडून चक्‍क सत्कार करण्यात आला. यावेळी पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी व्यवसाय शिक्षणातील गुणवंत्ताचा गौरव केला. अशाप्रकारे शिवदेंचा आदरतिथ्य झाल्याने शाळेच्याया गैरप्रकारबाबत 'ऑल ईज वेल'वर शिक्कामोर्तब झाल्याची शहरात चर्चा होती. तर शाळेकडून हा विशेष नियोजित कार्यक्रम होता, असे सांगण्यात आले. असे होते तर या कार्यक्रमात पत्रकारांना का आमंत्रीत केले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


अतिरिक्त साठ्याची चौकशी
दरम्‍यान पालिकेच्‍या शिक्षण समितीने या शाळेत विद्यार्थी संख्‍येपेक्षा अधिक साठा असल्‍याचा आरोप केला आहे. यावर शालेय पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी सांगितले की, 'या गोदामास सिल करण्यात अाले आहे मुख्यध्यापकांना नोटीस दिली असुन आता संपुर्ण साठा तपासणी केला जाईल अतिरिक्त धान्य साठा असल्यास चौकशी करून कायदेशिर कारवाई करण्यात येईल'


 

 

बातम्या आणखी आहेत...