आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 शासकीय जागांवर महापालिकेने बांधले घरकुल, ठेकेदाराला दिले काेट्यवधी रुपयांचे माेबिलायझेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घाेटाळ्यातील अटकसत्रानंतर तब्बल सहा वर्षांनी पुन्हा घरकुल प्रकरणाने डाेके वर काढले अाहे. शासनाच्या चार जागा असतानाही महापालिकेने विनापरवानगी घरकुलांचे बांधकाम केले अाहे. तसेच या शासकीय जागांवर काेट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ठेकेदारांना बिनव्याजी माेबिलायझेशन अॅडव्हान्स अदा करून पालिकेचे अार्थिक नुकसान केल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी उघडकीस अाणली अाहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, यासाठी स्वत: फिर्यादी व्हावे, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

 

घरकुल प्रकरणात माजी मंत्री, नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अटकसत्रामुळे जळगावचे नाव राज्यभरात पाेहाेचले हाेते. अाता महापालिकेच्या निवडणुकीच्या ताेंडावर पुन्हा घरकुल प्रकरणातील विषय चर्चेला अाले अाहेत. उल्हास साबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घरकुलांच्या बांधकामामुळे शासनाचे साेबत मनपाचे अार्थिक नुकसान झाल्याचा दावा केला अाहे.

 

जिल्हा प्रशासन अनभिज्ञ कसे?
घरकुले बांधून बरीच वर्षे झाली अाहेत. परंतु, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांपासून अाताच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत एकाने ही कार्यवाही केलेली नाही. शासनाच्या जागेवर बांधकामाची बाब प्रशासनाच्या कसे काय लक्षात अाली नाही? जिल्हा प्रशासन या गैरव्यवहारात सहभागी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला अाहे. यात शासनाचे तसेच मनपाचे ही अार्थिक नुकसान झाले अाहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: फिर्यादी हाेऊन पालिकेचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी साबळे यांनी पत्रकारांशी बाेलताना केली.

 

त्या जागांवर खरंच बांधकाम?
नगरपालिकेने शासनाच्या जागांवर घरकुले बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी काेट्यवधी रुपयांचे कर्जदेखील घेतले. काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला अॅडव्हान्स रक्कम दिली. परंतु, या जागांवर घरकुलांचे किती बांधकाम झाले? हे चाैकशीतून स्पष्ट हाेणार असून त्याबाबत प्रचंड उत्सुकता अाहे.

 

खान्देश बिल्डर्सला सुमारे ८ काेटींचा अॅडव्हान्स
हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर व तांबापुरा या जागा शासनाच्या मालकीच्या अाहेत. पालिकेने या शासकीय जागांवर घरकुले बांधल्याचे साबळेंनी सांगितले. या जागांवर काेट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले अाहे. घरकुल बांधणाऱ्या खान्देश बिल्डरला पाच जागांसाठी सुमारे ८ काेटी ४० लाख १५ हजार ४७९ रुपयांचा माेबिलायझेशन अॅडव्हान्ससुद्धा देऊन टाकल्याचा दावा करण्यात अाला अाहे.

 

मनपाची कृती बेकायदेशीर
शासकीय जागांवर घरकुले बांधणे ही महापालिकेची कृती मुळात बेकायदेशीर व फाैजदारी गुन्ह्यास पात्र अशी अाहे. सर्व जागा शासकीय असताना जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता या जागांवर घरकुले बांधणे, तसेच त्या जागांवर काेट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ठेकेदारांना मात्र काेट्यवधी रुपयांचा बिनव्याजी माेबिलायझेशन अॅडव्हान्स देऊन ते व्याज महापालिकेने भरावे, असा बेकायदेशीर ठराव करण्यात अाल्याचे साबळेंनी सांगितले.


अशी अाहे अॅडव्हान्सची रक्कम
तांबापुरा : १ काेटी ७२ लाख ३५ हजार रुपये एकूण
समतानगर : २ काेटी ४४ लाख ३२ हजार रुपये एकूण
हरिविठ्ठलनगर : २ काेटी २७ लाख ३५ हजार रुपये एकूण
खंडेरावनगर : १ काेटी ९६ लाख ११ हजार रुपये एकूण

बातम्या आणखी आहेत...