आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी पळ काढू नका, अन्यथा निलंबन; महापालिका अायुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीच्या कामांना गती अाली अाहे. प्रत्येकाला अापापली जबाबदारी पूर्ण करण्याची चिंता असणे अपेक्षित असताना मात्र सायंकाळी घरी जाण्याची घाई केली जाते. निवडणुकीच्या कामासाठी पुरेसा वेळ न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेत थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे. निवडणुकीच्या निमित्ताने दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू हाेता. मतदारांना मतदानाच्या स्लीप वाटपाची जबाबदारी बीएलअाेंवर साेपवण्यात अाली अाहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रभाग निहाय पथकांची घाेषणा करण्यात अाली.

 

महापालिका निवडणुकीसाठी अाता अवघे १६ दिवस शिल्लक राहिले अाहेत. एकेक दिवस मागे पडत असून प्रशासनाच्या कामांना गती अाली अाहे. निवडणुक अायाेगाचे अध्यक्ष एस. जे. सहारिया हे १८ राेजी जळगावात येत अाहेत. तर अायाेगाचे सचिव शेखर चन्ने शुक्रवारी येऊन गेले. अायाेगाने दिलेल्या निर्देशानुसार कामाचे स्वरूप असणे अपेक्षित अाहे. निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा हाेऊ नये, यादृष्टीने शनिवारी मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी सर्व २५ पथकांच्या कामांची गती अाणि झालेल्या कामांचा अाढावा घेण्यात अाला. या वेळी काही कर्मचारी नेहमीच्या सवयीप्रमाणे सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यावर घरी निघून जातात, तर वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबलेले असतात. दुसऱ्या दिवसाचे नियाेजन करताना कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अडचणी येतात, असे दिसून अाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुरेसा वेळ देणे अपेक्षित अाहे. परंतु, चुकांमध्ये सातत्य आढळल्यास संबंधितांवर थेट निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा अायुक्तांनी या बैठकीत देऊन कर्मचाऱ्यांचे कान टाेचले.

 

दाेन उपजिल्हाधिकाऱ्यांची मागणी
निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी दाेन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व सहा तहसीलदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी अायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली अाहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे तसेच आचारसंहितेचा भंग हाेणार नाही, याची दक्षता घेणे तसेच प्रभाग निहाय आचारसंहिता पथकाची निर्मिती केली जाणार अाहे.

 

मतमाेजणी केंद्र निश्चित: महापालिका निवडणुकीसाठी ४६९ मतदान केंद्र निश्चित करण्यात अाले अाहेत. मतदानानंतर मतमाेजणीच्या ठिकाणी टेबलांची संख्या व डिझाईन यावर चर्चा करण्यात अाली. प्रत्येक प्रभागासाठी दाेन टेबल राहणार असून फेऱ्यानिहाय मतमाेजणी केली जाणार अाहे. तसेच पाेलिसांकडूनही निकालाच्या दिवशी हाेणारी गर्दी लक्षात ठेऊन चाेख बंदाेबस्ताचे नियाेजन केले जात अाहे. दरम्यान, अाचारसंहितेचे उल्लंघन हाेऊ नये, यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवारांना वेळाेवेळी सुचना दिल्या जात अाहेत. खर्चाची तपासणीही बारकाईने केली जाणार असल्याचे सांगण्यात अाले.

 

प्रमुख सर्वच अधिकाऱ्यांची बैठक
मुख्य निवडणुक अधिकारी डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात टपाली मतपत्रिकांच्या छपाईबाबत चर्चा करण्यात अाली. शहरात १३५ सर्व्हिस वाेटर अाहेत. तसेच मतदान केंद्रावर मतपत्रिका प्रसिद्ध कराव्या लागणार अाहेत. चिन्ह वाटपानंतर चाेवीस तासात अाैरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालय येथून मतपत्रिका छापून घेतल्या जाणार अाहेत. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून अर्ज भरून त्यांनाही मतपत्रिका दिल्या जाणार अाहेत. यात प्रभागातील चार जागांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. यात पांढरा, पिवळा, गुलाबी, निळ्या रंगाची मतपत्रिका असेल.

 

बातम्या आणखी आहेत...