आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या चिमुकलीचा खुनी आदेशबाबाच, जळगाव पोलिसांनी उलगडले रहस्य; डीएनए जुळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी नंदा तात्याराव साळुंके उर्फ आदेश बाबा - Divya Marathi
आरोपी नंदा तात्याराव साळुंके उर्फ आदेश बाबा

जळगाव- शहरातील समतानगरातील नऊ वर्षीय चिमुकलीवर निर्दयीपणे अत्याचार करून नंतर गळा आवळून तिची हत्या आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा यानेच केल्याच्या ठाम निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. पीडित मुलगी व आदेशबाबा यांच्या डीएनए अहवालातून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


बुधवार, १३ जून रोजी सकाळी ७ वाजता समतानगरातील एका टेकडीवर पीडित मुलीचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीवर अत्याचार झाला असून नंतर गळा आवळून खून केला असल्याचे स्पष्ट झाले होते. तर दुसरीकडे पीडित मुलीच्या कुटंुबीयांनी एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी, १२ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यात संशयित म्हणून आदेशबाबा असल्याची नोंद त्यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शवविच्छेदनावेळीच मुलीचे डीएनए नमुने घेण्यात आले होते. अत्याचार झालेला असल्यामुळे त्या अनुषंगानेदेखील नमुने घेण्यात आले होते. 


या घटनेते आणखी काही संशयित असण्याची शक्यता व्यक्त करून आदेशबाबासोबत राहाणाऱ्या, चिलिम ओढणाऱ्या सात-आठ जणांची चौकशी केल. यातील पाच जणांचे डीएनए नमुने घतले. पोलिसांनी पीडित मुलीसह एकूण सात जणांचे नमुने पाठवले होते.  त्यातील अदेशबाबा व मुलीचे नमुने मिळते-जुळते असल्यामुळे त्यानेच मुलीवर आत्याचार करून खून केल्याचा निष्कर्ष काढला. 24 जून रोजी आदेशबाबा याला अटक करण्यात आली असून तो 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसउपाधीक्षक सचिन सांगळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...