आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव बायपासच्या कामाला सुरूवात; समांतर रस्ते प्रतिक्षेतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मार्गी लागलेल्या महामार्ग चाैपदरीकरणाच्या कामाला गती अाली अाहे. जिल्ह्यात दाेन्ही टप्प्यात काम करण्यात येत अाहे. जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासचे काम सध्या वेगाने सुरू झाल्याने येत्या वर्षभरात हा बायपास पूर्ण हाेण्याची अपेक्षा अाहे. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चाैपदरीकरण अाणि समांतर रस्त्याच्या कामाची तांत्रिक प्रक्रिया अद्याप पूर्ण हाेऊ शकलेली नाही. 


जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चिखली ते तरसोद या ६२.७ किलोमीटर व तरसोद ते फागणे या ८७.३ किलोमीटर टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला अाहे. तरसाेद ते फागणेपर्यंत पाच महिन्यापूर्वीच काम सुरू झाले असून चिखलीपर्यंत एप्रिलमध्ये कामाला सुरूवात झाली अाहे. तरसाेद -फागणे टप्प्यात येणाऱ्या जळगाव शहराच्या बायपासचे काम मे महिन्यात सुरू झाले अाहे. शहराच्या उत्तरेकडील भागातून विद्यापीठ प्रवेशद्वारापासून तर अाव्हाणे, ममुराबाद, अासाेदा शिवारातून तरसाेदपर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार अाहे. या भागातील भूसंपादनाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जमिनीचा ताबा अाणि मार्किंगचे काम करण्यात अाले अाहे. हद्द निश्चित केल्यानंतर सपाटीकरणाला प्रारंभ करण्यात अाला अाहे. तरसाेद फाट्यापासून सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली अाहे. दुसऱ्या टाेकाला विद्यापीठ प्रवेशद्वारापासून काम सुरू झाले अाहे. या रस्त्यावर बांभाेरी गावाजवळ गिरणा नदीवर पूल उभारण्यात येणार अाहे. सुरत रेल्वेलाईन अाणि अासाेदा- तरसाेद शिवारातील रेल्वेलाईनवर पूल उभारावा लागणार अाहे. तीन पूल अाणि ११ किलाेमिटरचा बायपास उभारणीसाठी वर्षभराचा कालावधी अपेक्षीत अाहे. जळगाव शिवारातील माती काळी असल्यामुळे बायपासचे काम करतांना माेठ्या प्रमाणावर खाेदकाम करून मुरूम भरती करावा लागणार अाहे. त्या दृष्टीने मक्तेदार कंपनीकडून नियाेजन केले जात अाहे. 


समांतर रस्त्यांच्या डिपीअारचा तांत्रिक प्रवास 
महामार्गाचे चाैपदरीकरण अाणि समांतर रस्ते बनविण्यासाठी सुरूवातीला १०० काेटी रूपये देण्यात अाले हाेते. त्यात मार्च महिन्यात अाणखी २५ काेटी रूपये वाढविण्यात अाले. एप्रिलअखेर हा प्रकल्प १३९ काेटींवर पाेहचला अाहे. उपलब्ध निधीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डीपीअार तयार केला अाहे. डिसेंबर २०१७ पूर्वीच डीपीअार तयार करण्यात अाला असला तरी प्रशासकीय यंत्रणा नव्या डीपीअार अाडून बचाव करीत अाहे. नव्याने तयार केलेला डीपीअार अाता पुन्हा दिल्लीत मंजुरीसाठी पाठविण्यात अालेला अाहे. डीपीअार मंजुरीनंतर टेंडर काॅल करणे अाणि त्यांच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यासाठी अाॅक्टाेबर महिना उजाडण्याची चिन्हे अाहेत. टेंडर प्रक्रियेत कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यास ही प्रक्रिया अाणखी वाढत जात असल्याचा धाेका असताे. त्यामुळे गुंतागुंतीची तांत्रिक प्रक्रिया साेपी करण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, समांतर रस्त्यासाठीचा पाठपुरावा देखील बंद झाल्याने या कामात प्रशासकिय सुस्तावलेपणा अाल्याची स्थिती अाहे. 

बातम्या आणखी आहेत...