आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले निवडणूक अायाेगाचे अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अागामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सतरा मजली इमारतीत तयार करण्यात अालेल्या स्ट्रॉंगरूमची पाहणी करण्यासाठी बुधवारी राज्य निवडणूक अायाेगाचे अधिकारी अाले हाेते. पालिकेच्या लिफ्टचा कटू अनुभव अायाेगाच्या अधिकाऱ्यांना अाला. तपासणी करून परतीच्या मार्गावर असताना अचानक लिफ्ट बंद पडल्याने महिला अधिकाऱ्यांमध्ये काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले; परंतु अवघ्या ४ मिनिटात पुन्हा लिफ्ट सुरू झाल्याने सुटकेचा नि:श्वास साेडला.

 

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ईव्हीएम अाणि गाेडाऊन अर्थात स्ट्रांॅगरूमची तपासणी करण्यासाठी राज्य निवडणूक अायाेगाचे पथक दाैऱ्यावर अाले अाहे. यात बुधवारी दुपारी १२.३० वाजता निवडणूक अायाेगाच्या अधिकारी अारती सरवद- अाहेर, भारती पाटील व तृप्ती हणमशेठ महापालिकेच्या सतरा मजली इमारतीत दाखल झाल्या हाेत्या. या वेळी त्यांच्यासाेबत उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील, उपायुक्त चंद्रकांत खाेसे, अास्थापना विभागाचे प्रमुख सुभाष मराठे, अग्निशमन विभागाचे वसंत काेळी, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत वांद्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.


स्माेक डिटेक्टरची घेतली चाचणी
स्ट्रॉंग रूमचे सील पथकाच्या समाेर उघडण्यात अाले. त्यानंतर पथकाने स्ट्रांॅगरूममध्ये निवडणूक अायाेगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले अाहे की नाही याची तपासणी केली. या वेळी हाॅलमध्ये तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे तपासले. तसेच ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी असलेल्या पेट्या, त्या ठिकाणी काही अागीची दुर्घटना घडल्यास अाग विझवण्यासाठी असलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात अाली. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४८ ईव्हीएमचे कंट्राेल युनिटची पाहणी केली. फायर अलार्म सुरू अाहे की नाही याची खात्री करण्यासाठी थेट स्मोक डिटेक्टरजवळ धूर करून अलार्मचा अावाज येताे की नाही याची चाचणी घेतली.

बातम्या आणखी आहेत...