आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेतील जळगावची कामगिरी उंचावली; 84व्या क्रमांकावर स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्वच्छ भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात अालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव शहराचा पहिल्या १०० शहरांत समावेश अाहे. देशभरातील ४ हजार ४१ शहरांमध्ये जळगाव महानगरपालिकेने यंदा ८४वा क्रमांक पटकावला.


केंद्रीय समितीने केलेली पाहणी, दैनंदिन साफसफाईला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद या बळावर हा पल्ला गाठता अाला. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेसंदर्भात अजून भरपूर कामे करावी लागणार असल्याचे यातून स्पष्ट झाले असले तरी स्वच्छतेची कामगिरी उंचावत असल्याचे चित्र समाेर अाले अाहे. जळगाव शहराला हागणदारीमुक्तीचा किताब मिळाल्यानंतर प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी झाेकून काम करायला सुरुवात केली हाेती. त्याचे फळ पदरात पडले अाहे. देशभरातील पहिल्या १०० स्वच्छ शहरांच्या यादीत जळगावचे नाव झळकले अाहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी ४ हजार ४१ शहरांची निवड करण्यात अाली हाेती. यात अमृत याेजनेची कामे सुरू असलेल्या सुमारे ५०० शहरांचाही समावेश हाेता. या सर्वेक्षणासाठी ४ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान देशभरात पाहणी करण्यात अाली हाेती. दिल्लीच्या केंद्रीय समितीने जळगाव शहरात २६ फेब्रुवारी ते २ मार्च या सहा दिवसांत पाहणी केली हाेती.

 

प्रशासनाला अधिक कामाची गरज
स्वच्छ सर्वेक्षणात विजयी ठरलेल्या शहरांना पुरस्काराचे वितरण शनिवारी इंदूर येथे करण्यात अाले. या वेळी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली अाहे. यात जळगाव शहराचा ८४वा क्रमांक अाला अाहे. १ हजार ४०० पैकी २ हजार ६३४ गुण प्राप्त झाले. मात्र, असे असले तरी पालिका प्रशासनाला शहरातील स्वच्छतेच्या कामांत अधिक वाढ करावी लागणार अाहे, हे या अभियानातून समाेर अाले.


या कामांसाठी १ हजार ४०० पैकी केवळ ४७० गुण मिळाले असून महापालिका काठावर पास झाली अाहे. शहरातील नागरिकांनी स्वच्छतेच्या कामासंदर्भात समाधान व्यक्त केल्यामुळे पालिकेच्या गुणांत वाढ झाली अाहे. अाराेग्य विभागाला ४ हजार गुणांपैकी ३१०० गुण मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु, पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये कमी पडल्याचे पुढे अाले अाहे.

 

 

पुढच्या वर्षी पहिल्या ५०मध्ये स्थान मिळवू
स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला अाहे. यात जळगाव शहराला ८४वा क्रमांक मिळाला. या निकालाचा अभ्यास करून शहरातील साफसफाईवर अधिक भर दिला जाईल. घंटागाडीतून कचऱ्याचे संकलन, कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. अागामी वर्षभरात शहरातील स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जाईल. पुढच्या वर्षी शहर पहिल्या ५०मध्ये राहील यासाठी ठाेस धाेरण अाखून कृतीशिल प्रयत्न करण्यात येतील.
- चंद्रकांत डांगे, अायुक्त, महापालिका

 

...तर 'टाॅप फिफ्टी'त राहिले असते जळगाव
स्वच्छ सर्वेक्षणाच्या स्पर्धेत महापालिकेकडून कचऱ्यावर हाेणाऱ्या प्रक्रियेसाठी गुण दिले जातात. परंतु जळगाव महापालिकेचा घनकचरा प्रकल्प चार वर्षापासून बंद अाहे. ताे सुरू करण्यासंदर्भात अपेक्षित प्रयत्न हाेऊ शकले नाहीत. शहरात अाेला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रीया करण्यात येत नसल्याने पालिकेचे ४२० गुण मिळू शकले नाहीत. अन्यथा जळगाव शहर पहिल्या ५० मध्ये अाले असते.

 

असे अाहेत गुण
- महानगरपालिकेने स्वच्छतेसंदर्भात केलेल्या कामांसाठी १ हजार ४०० पैकी ४७० गुण प्राप्त झाले.
- शहरात स्वच्छतेसंदर्भात केलेल्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीत १ हजार २०० पैकी ९६७ गुण मिळाले.
- स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी १ हजार ४०० पैकी १ हजार १९७ गुण मिळाले.

 

स्वच्छ सर्वेक्षण
गेल्या वर्षी महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात ४५० शहरांत १६४ वा क्रमांक हाेता. यंदा त्यात सुधारणा झाली असून ४ हजार ४१ शहरांत ८४व्या क्रमांकावर झेप घेता अाली. पालिकेचे तत्कालीन अायुक्त तथा जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात प्रभारी अतिरिक्त अायुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खाेसे, अाराेग्याधिकारी उदय पाटील, शहर समन्वयक महेंद्र पवार अादींनी सर्वेक्षणापूर्वीचे तीन महीने जनजागृती केली. त्याला कृतीशिल प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...