आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव-मुंबई विमानसेवा अखेर बंद; कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कानावर हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उडान प्रकल्पांतर्गत सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली जळगाव-मुंबई विमानसेवा जवळपास बंद झाल्यातच जमा आहे. जळगावसह नाशिक आणि कोल्हापूर येथूनही उडान अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. गेल्या १५ दिवसांपासून या तिन्ही शहरातील विमानसेवा बंद आहे. याठिकाणी विमानसेवा देणाऱ्या एअर डेक्कन चार्टर सर्व्हिसेस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात छेडले असता, त्यांनी कानावर हात ठेवले. तिन्ही शहरांतील सेवा बंद झाल्याची माहिती नसल्याचे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्याने माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. 


दरम्यान, जळगावातून चांगला प्रतिसाद असूनही विमानसेवा बंद झाल्यामुळे व्यापारी, उद्योजकांचा हिरमोड झाला आहे. माेदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत लहान शहरांना महानगरांशी जाेडण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल, अशी विमान सेवा 'उडान' या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात अाली. या याेजनेच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातील जळगाव, नाशिक, काेल्हापूरसह पाच शहरांचा समावेश हाेता. 


२३ डिसेंबर राेजी जळगाव व नाशिक येथून मुंबई विमान सेवा सुरू करण्यात अाली होती. परंतु या विमानसेवेला अनियमित उड्डाणामुळे प्रारंभापासूनच ग्रहण लागले होते. ऐनवेळी फेऱ्या रद्द हाेणे, उड्डाणास विलंब होणे, याशिवाय पायलटची उपलब्धता नसणे, मुंबई विमानतळावरील एअर ट्रॅफिकमुळे 'स्लाॅट' उपलब्ध न हाेणे अादी कारणांमुुळेही सेवेेवर विपरीत परिणाम होत होता. मात्र, गेल्या १५ जूनपासून एअर डेक्कनच्या संकेतस्थळावर 'नाे-फ्लाइट' जाहीर करण्यात अाले अाहे. नाशिक येथील विमानसेवा गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात अाली अाहे.तर काेल्हापूर- मुंबई ही विमानसेवाही गेल्या अाठवड्यातच बंद झालेली अाहे. 


विमानसेवा बंद हाेण्याची माहिती नाही 
गेल्या अाठवड्यात रजेवर हाेताे. महाराष्ट्रातील तिन्ही ठिकाणची विमानसेवा बंद झाल्याची माहिती मलाही अाताच मिळाली अाहे. याबाबतची कारणे मात्र माहित नाही. 
- थालेश्वर जीगर, राष्ट्रीय विपणन व व्यवस्थापन प्रमुख, एअर डेक्कन 


दुसऱ्या कंपनीला देऊन सेवा सुरू ठेवावी 
जळगाव- मुंबई विमान सेवेला अनेक अडचणी असताना जळगावातून चांगला प्रतिसाद मिळत हाेता. कंपनीने जळगाव - पुणे सेवा सुरू करण्याचा दावा केला हाेता. ती सेवाही सुरू केली नाही. एअर डेक्कन कंपनीच्या संकेत स्थळावर १५ जूनपासून 'नाे-फ्लाइट' जाहीर करण्यात अाले अाहे. एअर डेक्कन ऐवजी दुसऱ्या कंपनीला हा रुट देऊन विमानसेवा सुरू ठेवावी. पुण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्यात यावी. 
- पुरुषाेत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महामंडळ 

बातम्या आणखी आहेत...