आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कार्यालयातही गजबज, ९७ इच्छुकांना दिले उमेदवारी अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भाजपने बुधवारी वटपाेैर्णिमेचा मुहूर्त साधत महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वितरण सुरू केले अाहे. या अर्जांचे वितरण महानगराध्यक्ष अामदार सुरेश भाेळे यांच्या हस्ते करण्यात अाले. शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती माेठ्या प्रमाणात दिसून अाली. 


भाजप महानगरतर्फे बुधवारी सकाळी ११.३० वाजता भाजप कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रथम निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या महिलांना अर्ज वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांना पहिला अर्ज देऊन शुभारंभ करण्यात आला. पहिल्या एक तासात ४५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले तर सायंकाळपर्यंत ९७ इच्छुक उमेदवारांनी भाजप कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतले. इच्छुक उमेदवारांसाठी २९ जून राेजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी मागणी अर्ज उपलब्ध राहणार अाहेत. याठिकाणी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे, शोभा कुलकर्णी, दत्तात्रय जाधव हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात अाले. 


महापाैर भाजपचाच हाेणार : भाेळे 
अद्याप अाघाडी किंवा स्वबळावर लढण्याचा निर्णय झालेला नसला तरी अर्ज वाटपावेळी अामदार सुरेश भाेळे यांनी भाजपचाच महापाैर हाेण्याचा मनोदय व्यक्त केला. अर्ज वाटपाला मनपा गटनेते सुनील माळी, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र घुगे, सुभाष शौचे, बापू ठाकरे, नितीन इंगळे, ज्योती चव्हाण, सरिता नेरकर, वंदना पाटील, किशोर चौधरी, मनोज भांडारकर, जिल्हा महिलाध्यक्ष जयश्री पाटील, युवा अध्यक्ष जितेंद्र मराठे, मंडलाध्यक्ष राजू मराठे, कपील पाटील, प्रदीप रोटे, धीरज सोनवणे, राहुल पाटील, प्रा.जीवन अत्तरदे, सुशील हासवाणी, विनोद मराठे, राहुल वाघ, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, अनिल देशमुख, किशोर बाविस्कर, प्रकाश बालानी, नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेवक संजय चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


खाविअाच्या ६२ अर्जांची विक्री 
महापालिका निवडणुकीसाठी सगळ्यात अाधी तयारीला लागलेल्या खान्देश विकास अाघाडीमार्फत निवडणूक लढण्यासाठी ६२ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले अाहेत. ३० जून पर्यंत अर्ज भरून मागविण्यात अाले असून १ जुलैपासून मुलाखतींचा कार्यक्रम राबवला जाण्याची शक्यता अाहे. अातापर्यंत १० इच्छुकांनी अाठ पानी अर्ज भरून सादर केला अाहे. अर्जाची किंमत ५००० हजार रूपये असल्याने निवडणूक लढण्याची मानसिक तयारी असलेल्या इच्छुकांकडून अर्जाची खरेदी सुरू अाहे. दरम्यान खान्देश विकास अाघाडीचे नेते माजी अामदार सुरेश जैन हे मंुबईला असल्याने '७ शिवाजी नगर'ला शुकशुकाट हाेता. मात्र खाविअाचे अध्यक्ष रमेश जैन हे खान्देश काॅम्प्लेक्समधील कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत हाेते. 

बातम्या आणखी आहेत...