आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत युती टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे देव पाण्यात; संधी हुकण्याची अनेकांना भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत युतीसंदर्भात एकाच बाजूने जाेर लावला जात हाेता. परंतु, समविचारी पक्षांसाेबत युती करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे युतीच्या चर्चांना जाेर अाला अाहे. दाेन्ही पक्षांचे नेते युतीसाठी सकारात्मक असले तरी पक्षाचा कार्यकर्ता मात्र अडचणीत सापडण्याची स्थिती निर्माण झाली अाहे. युती झाल्यास जागा वाटपात संधी हुकेल, या भीतीने अनेकांनी युती टळावी म्हणून देव पाण्यात टाकले अाहेत. 


महापालिका निवडणुकीला अाणखी दाेन महिने अवकाश अाहे. अद्याप प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली नसून मतदार याद्यांचाच घाेळ सुरू अाहे. २९ जून राेजी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात हाेईल. दरम्यान शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर युतीसाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. खाविअा अर्थात शिवसेनेचे नेते माजी अामदार सुरेश जैन यांनी भाजपसाेबत युतीसाठी प्रयत्न सुरू ठेवले अाहेत. तर भाजपच्या वतीने गेली तीन महिने शांती मंत्रांचा जप सुरू ठेवला हाेता. अखेर भाजपच्या नेत्यांनी अापले माैन साेडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच समविचारी पक्षांसाेबत युतीची तयारी असल्याचे स्पष्ट केले अाहे. त्यामुळे युती हाेईल की नाही? याबाबत साशंकतेचे वातावरण असताना अाता पुन्हा चर्चेचे गुऱ्हाड सुरू झाले अाहे. 

 

संधी हुकण्याची भीती 
महापालिकेत खाविअाची सत्ता असून भाजपासाेबत युती करताना जागा वाटपाचा तिढा निर्माण हाेऊ शकताे. युती झाल्यास दाेन्ही पक्षांकडील विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांना दिलेल्या अाश्वासनांचे काय हाेणार हा देखील प्रश्न निर्माण हाेणार अाहे. युती झाल्यास दाेन्ही पक्षातील इच्छुकांची संधी हुकण्याची शक्यता अाहे. जर युती नाही झाली तर निवडणूक लढण्याची संधी प्राप्त हाेईल, या शक्यतेने अनेकांनी कामाला सुरुवात केली अाहे. दरम्यान, युती हाेऊ नये, अशीच इच्छा कार्यकर्ते व्यक्त करत असून देव पाण्यात टाकले अाहेत. 


महापाैर काेणाचा हाेणार? 
गेली अनेक वर्षे जळगाव शहरात सत्ता अबाधित ठेवलेले सुरेश जैन यांनी महापाैर शिवसेनेचा हाेईल, असे जाहीर केले अाहे. तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापाैर भाजपचा हाेईल, असे मत व्यक्त केले अाहे. त्यामुळे युती झाल्यास जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील. यासाठी जास्त जागांवर उमेदवार उभे करावे लागणार अाहेत. अशा परिस्थितीत शिवसेना अथवा खाविअा तसेच भाजपत जागा वाटपात कितपत चर्चा यशस्वी हाेते, याकडेही लक्ष लागून अाहे. पुढच्या अाठवड्यात जलसंपदामंत्री महाजन हे शिवसेना नेते सुरेश जैन यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात अाहे. 


युतीसंदर्भात अाठवडाभरात हाेणार बैठक
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी अामदार सुरेश जैन यांच्यात साेमवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. महापालिकेत युतीसंदर्भात अाठवडाभरात बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार अाहे. 


नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक हाेत अाहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी दंड थाेपटले अाहेत. निवडणुकीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी अामदार सुरेश जैन यांच्याशी साेमवारी सायंकाळी संपर्क साधला. दाेघांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना अर्थात खाविअाच्या युतीसंदर्भात पुढच्या अाठवड्यात जळगावात अाल्यानंतर चर्चा करू, असेही पालकमंत्री पाटील यांनी जैन यांच्याशी बाेलताना सांगितले. त्यामुळे पुढच्या अाठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी अामदार सुरेश जैन यांच्यात युतीसंदर्भात चर्चा हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, पालकमंत्र्यांसाेबत बाेलणे झाल्याच्या वृत्तास जैन यांनी दुजाेरा दिला अाहे. तसेच युतीसंदर्भात भाजपला अापला प्रस्ताव दिला असून त्यांच्याकडून निराेप मिळाल्यावर चर्चेसाठी भेटू, असेही जैन यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...