आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडी समविचारी पक्षांना साेबत घेणार; पक्ष कार्यालये अाज गजबजणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या अाहेत. काँॅग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने अाघाडी करून समविचारी पक्षांना साेबत घेऊन लढण्याचा मनाेदय व्यक्त केला अाहे. समाजवादी पार्टीने वाॅर्ड क्रमांक १८मध्ये डाॅ. रियाज शेख यांची उमेदवारी गेल्या अाठवड्यात जाहीर केली. त्यापाठाेपाठ एमअायएमने २ उमेदवार जाहीर केले. 


समाजवादी पार्टीच्या राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात अाल्या अाहेत. जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुरुवारी जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. या दाैऱ्यात ते काेअर कमिटीची बैठक, जिल्हा पदाधिकारी निवड व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अागामी महापालिका निवडणुकीत कुणासाेबत जायचे? याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सपाचे प्रभारी रागीब अहमद यांनी 'दिव्य मराठी'ला साेमवारी दिली. 


समाजवादी पार्टीच्या राज्याच्या सर्व कार्यकारिणी गेल्या अाठवड्यात बरखास्त करण्यात अाल्या अाहेत. जळगाव जिल्हाच्या कार्यकारिणीचा देखील त्यात समावेश अाहे. त्यामुळे नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यासाठी प्रदेश पदाधिकारी दाैऱ्यावर येत अाहेत. प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद माेईन, प्रदेश सचिव अब्दुल रऊफ शेख हे यानिमित्त गुरुवारी शहरात येत अाहेत. बैठकीला प्रदेश सचिव अहमद हुसेन, जिल्हा काेअर कमिटीचे चेअरमन साजिद शेख, सलिम इनामदार, रफीउद्दीन खान, सलीम पटेल, रईस बागवान, रिजवान जहाॅंगिरदार, प्रभारी रागिब अहमद यांची उपस्थिती राहील. 


पक्ष कार्यालयांत शांतता 
साेमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र, शिक्षक मतदारसंघासाठी दिवसभर मतदान सुरू असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यालयात शांतता हाेती. भाजपचे वसंत स्मृती व राष्ट्रवादीच्या कार्यालयात सायंकाळी ४ वाजता फेरफटका मारला असता कार्यकर्ते व पदाधिकारी तेथे दिसले नाहीत. उद्यापासून या कार्यालयांत गजबज वाढण्याचे संकेत अाहेत.

 
युती झाली तर ठिक अन्यथा स्वतंत्र लढू 
कधी ना कधी निवडणूक व्हायची हाेती. एक महिना अाधीच निवडणूक जाहीर झाल्याने स्वागतच अाहे. सर्वच राजकीय पक्षांकडून कामाला अंतर्गत सुरुवात झाली अाहे. येत्या दाेन-तीन दिवसांत युतीसंदर्भात बैठक हाेईल. युती झाल्यास ठिक अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी अाहे. पक्ष की अाघाडी याबाबतही अाठवडाभरात अापली भूमिका जाहीर करणार. 
- सुरेश जैन, माजी अामदार 


लवकरच बैठक, अाघाडीची तयारी सुरू करणार 
महापालिका निवडणुकीची घाेषणा झाल्याने अाता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अाघाडीची तयारी सुरू करू. जागा वाटपासंदर्भात लवकरच बैठक अायाेजित करून निश्चिती करण्यात येईल. त्यानुसार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम अाखण्यात येणार अाहे. येत्या अाठवडाभरात दाेन्ही पक्षांच्या अाघाडीमार्फत भूमिका स्पष्ट करण्यात येईल. गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते 


उमेदवार निश्चित, लवकरच भूमिका मांडू 
अाम्ही सुरेशदादांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार अाहाेत. त्यामुळे मनसेच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा प्रश्नच नाही. गेल्या दाेन महिन्यांपासून निवडणुकीच्या कामाला लागलाे अाहाेत. त्यामुळे अचानक अाचारसंहिता लागल्याने धक्का बसण्याचे कारण नाही. लवकरच भूमिका स्पष्ट करू. 
- ललित काेल्हे, महापाैर 

 

राष्ट्रवादीसाेबत अाघाडी करू 
एक महिनाअाधी निवडणूक हाेत अाहेे. अद्याप अंतिम मतदार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे लवकर निवडणूक घेण्याबाबत अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. निवडणूक अायाेग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम तर करत नाही ना? या संशयाला वाव मिळत अाहे. निवडणुकीत राष्ट्रवादीसाेबत अाघाडी केली जाणार अाहे. समविचारी पक्षांना साेबत घेऊ. 
- डाॅ. राधेश्याम चाैधरी, महानगर कार्याध्यक्ष, काँग्रेस 


स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण 
निवडणूक कार्यक्रम अपेक्षेपेक्षा १५ ते २० दिवस अगाेदर जाहीर झाला. गेल्या वर्षभरापासून निवडणुकीसाठी तयारी सुरू अाहे. शहरात बुथ रचना करण्यात अालेली अाहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे स्ट्रक्चर पूर्णपणे तयार अाहे. युतीबाबत अद्याप श्रेष्ठींचा निर्णय मिळालेला नाही. मात्र, कार्यकर्त्यांना पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा अाहे. बुधवारपासून इच्छुकांना अर्ज वाटप सुरु करण्यात येणार अाहेत. चाचपणी सुरू अाहे. 
- अामदार सुरेश भाेळे, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप 


जातीयवादी पक्षांसाेबत युती नाही 
जातीयवादी किंवा सांप्रदायिक पक्षांसाेबत महापालिकेत युती करायची नाही,असे पक्षाचे तत्व अाहे. माजी मंत्री सुरेश जैन यांनी महायुतीची घाेषणा केली हाेती. दुसरीकडे त्यांची भाजपसाेबत अाघाडीची चर्चा सुरू अाहे.२८ राेजी समाजवादी पार्टीच्या काेअर कमिटीची बैठक जिल्ह्यात हाेत अाहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. ताेपर्यंत 'वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका अाहे.

- रागीब अहमद, प्रभारी, समाजवादी पार्टी 


त्रयस्थ संस्थांमार्फत हाेईल मतदान केंद्रांची तपासणी 
निवडणूक अायाेगाच्या अादेशानुसार महापालिका निवडणुकीत अादर्श मतदान केंद्र तयार करण्यात येतील. या केंद्रांची तपासणी त्रयस्थ संस्था, मंडळ व सेवाभावी संस्थांकडून केली जाणार अाहे. यासाठी १० पथके तयार केली जाणार अाहेत. मतदानासाठी सुमारे ५०७ मतदान केंद्र असणार अाहेत. त्या ठिकाणी अायाेगाच्या निर्देशानुसार असलेल्या व्यवस्थेचे निरीक्षण पथकामार्फत केले जाणार अाहे. 


ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी 
महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच अाैरंगाबाद येथील एमअायएमचे अामदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हैद्राबाद येथे पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून उमेदवार उभे करण्याच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले अाहे. मी स्वत: (रियाज जहागिरदार) व जिया बागवान असे उमेदवार असणार अाहाेत. ताकदीने निवडणूक लढवण्यात येईल. 
- रियान जहागिरदार, महानगराध्यक्ष, एमअायएम 

बातम्या आणखी आहेत...