आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ३५ दिवसांचा कालावधी; भाजपची स्वबळाची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम साेमवारी जाहीर झाला. मतदान १ अाॅगस्ट राेजी हाेणार अाहे. गेल्या वर्षाच्या नियाेजनापेक्षा महिनाभर अाधीच निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या हाती केवळ ३५ दिवसांचा कालावधी अाहे. भाजपने स्वबळाची तयारी चालवली अाहे. तर एमअायएमने दाेन उमेदवार जाहीर करून अाघाडी घेतली. 


महापालिकेच्या निवडणुकीची घाेषणा झाल्यानंतर 'सतरा मजली ' इमारतीतील वातावरण क्षणात बदलले. जुन्यांसाेबत अाता काही नवीन चेहरे पालिकेच्या प्रांगणात नजरेस पडतील. अागामी ३५ दिवस हे पालिका प्रशासनाला रात्रीचा दिवस करावा लागेल. अाज ना उद्या निवडणुकीला सामाेरे जायचे हाेते, असे मत व्यक्त करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनतीची मानसिकता केल्याचे बाेलण्यातून जाणवले. साेमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच कामानिमित्त सतरा मजलीत अालेल्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या निवासस्थानी तसेच पक्ष कार्यालयात जाणे पसंत केले. एक महिनाअाधी निवडणुकीचा माहाेल तयार झाला अाहे. 


निवडणूक अायुक्तांनी दिला 'सरप्राइज धक्का' 
राज्य निवडणूक अायाेगाने साेमवारी सकाळी ११ वाजता व्हिडिअाे काॅन्फरन्सचे अायाेजन केले हाेते. पालिका अायुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खाेसे, लक्ष्मीकांत कहार, अधीक्षक सुनील गाेराणे उपस्थित हाेते. सांगली, मिरज व जळगाव महापालिका अायुक्तांना उद्देशुन अायुक्त ज.स. सहारिया यांनी अानंदाची बातमी सांगताे, असे स्पष्ट करत या क्षणापासून महापालिका निवडणुकीसाठी अाचारसंहिता लागू करत असल्याचे सांगितले. हे एेकल्यानंतर महापालिका अधिकारी अवाक‌् झाले. 


राजकीय पक्षांचे तळ्यात मळ्यात 
निवडणूक जाहीर झाली तरी राजकीय पक्षांचे तळ्यात-मळ्यात सुरू अाहे. अाठवडाभरात पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू हाेऊन भूमिका जाहीर हाेऊ शकते. दरम्यान, अाठवडाभरात पक्ष व अाघाड्यांची काेअर कमिटी तयार करणे, मुलाखती घेणे, उमदेवार जाहीर करणे, जाहीरनामे तयार करून त्याची घाेषणा करणे अादी कामांना वेग येईल. 


उपद्रवींवर कारवाईसाठी घेतली बैठक 
पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात साेमवारी सायंकाळी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बाेलावण्यात अाली हाेती. तत्पुर्वी पाेलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची बैठक झाली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात चाेख नियाेजन करण्यात येणार अाहे. अाचारसंहिता जाहीर हाेताच पदाधिकाऱ्यांनी वाहने जमा केली.


जात वैधता प्रमाणपत्र
राखीव जागांसाठी उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार अाहे. नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत ११ जुलै अाहे. त्यामुळे इच्छुकांच्या हाती केवळ १५ दिवस उरले अाहेत. 

 

इच्छुक उमेदवार दडपणात 
सन २०१३मध्ये झालेल्या पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ जुलैला अाचारसंहिता लागू झाली हाेती. यंदा २७ दिवस अाधीच अाचारसंहिता लागू झाली अाहे. काेणाच्याही ध्यानी-मनी नसताना अचानक निवडणूक अायाेगाने पालिकेची निवडणूक जाहीर केल्याने नगरसेवक दडपणात अाले अाहेत. अवघ्या महिनाभरात महापालिका निवडणूक अाटाेपेल. सन २०१३मध्ये १ सप्टेंबरला मतदान झाले हाेते. तर सध्या हाेऊ घातलेल्या निवडणुकीसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान घेण्यात येणार अाहे. 


देणग्यांसाठी यंदा तगादा हाेणार कमी 
निवडणूक म्हटली की उमेदवारांना मतदानाची गरज असते. उमेदवारांचे हात दगडाखाली असल्याचे लक्षात घेता मंडळांचे कार्यकर्ते इच्छुकांकडे पावती पुस्तके घेऊन धडकतात. यंदा गणेशाेत्सव सप्टेंबरपासून सुरू हाेत अाहे. यात पालिकेची निवडणूक तब्बल दीड महिन्याअाधीच उरकणार अाहे. त्यामुळे इच्छुकांकडे देणगीसाठी हाेणारा तगादा यावर्षी कमी असेल. 

 

असा गेला ५ वर्षांचा कालखंड 
२०१३च्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती हाेती. स्पष्ट बहुमत नसल्याने सर्वात जास्त जागा असलेल्या खाविअाला टेकू घ्यावा लागला हाेता. राष्ट्रवादी तटस्थ राहील्याने भाजप व मनसेच्या विराेधात खाविअाने सत्ता मिळवली हाेती. तीन वर्षांनंतर पुन्हा महापाैर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. या वेळी मनसेने खाविअाला पाठिंबा देत उपमहापाैरपद पदरात पाडून घेतले. त्यानंतर वर्षभरापासून मनसेला महापाैरपद मिळाले. सध्या भाजप वगळता सर्व पक्ष सत्तेत अाहेत. राष्ट्रवादीला महिला बालकल्याण समिती सभापतिपद मिळालेे. दरम्यान पालिकेत १० वर्षांनंतर प्रथमच भाजपला स्थायी समिती सभापतिपदाच्या माध्यमातून पालिकेच्या तिजाेरीच्या चाव्या मिळाल्या हाेत्या. 


मतदार याद्यांचा घाेळ 
महापालिकेने ५ जून राेजी ३ लाख ६५ हजार १५ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली अाहे. त्यासंदर्भात २२१७ अर्जांच्या माध्यमातून ५६ हजार २८८ नावांवर हरकती दाखल झाल्या. १९ प्रभागांतील १९ अभियंत्यांच्या पथकामार्फत हरकतींची चाैकशी सुरू अाहे. २९ जून राेजी अंतिम मतदार यादी जाहीर हाेईल. त्यात नगरसेवकांनी दाखल केलेल्या हरकतीनुसार नावांची खात्री नगरसेवकांनी करून द्यावी, अशी अपेक्षा अधिकारी वर्ग करीत असल्याचे चित्र अाहे. 

बातम्या आणखी आहेत...