आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटिंग असेल तर अाताच चालते व्हा, दगा दिला तर याद राखा!; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिली तंबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एेन निवडणुकीच्या तोंडावर महानगराध्यक्षांसह ५ नगरसेवक विराेधी पक्षांना जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी तातडीने जिल्हा बैठक बाेलावली हाेती. पक्षातील पडझड थांबवून निवडणुकीला सामाेरे जाण्याचे आव्हान पेलत जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी पक्षात तळ्यात-मळ्यात असलेल्यांना चालते हाेण्याचा इशारा दिला. 'कुणाची सेटिंग असेल तर अाताच चालते व्हा, निवडणुकीत एेनवेळी दगा दिला तर खबरदार', असा इशारा देत जे पक्ष साेडून गेेलेत, अशा पळपुट्यांना सर्वाेताेपरी ताकद वापरून त्यांचा पराभव करण्याचा राजकीय विडा पक्षाच्या बैठकीत उचलण्यात अाला. 


जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजित बैठकीला शहराचे निरीक्षक रंगन्नाथ काळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अॅड. वसंतराव माेरे, माजी अामदार गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, दिलीप साेनवणे, अरुण पाटील, अल्पसंख्याक अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, अॅड. रवींद्र पाटील, अनिल पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, महानगर अध्यक्षा नीला चाैधरी, माजी महानगर अध्यक्षा मीनल पाटील, प्रतिभा शिरसाठ, नगरसेविका अाश्विनी देशमुख, लता माेरे, कल्पिता पाटील, सविता बाेरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. जिल्हाध्यक्ष डाॅ. सतीश पाटील यांनी संघटनात्मक अाढावा घेत उमेदवारी देताना पक्षाशी निष्ठा असलेल्यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पक्षातून बाहेर पडलेल्यांना निवडून येऊन दाखवावे, त्यांच्याविराेधात पक्षाची सर्व ताकत लावून त्यांचा पराभव करण्याचा निर्धार त्यांनी या वेळी केला. दरम्यान, पक्षाच्या प्रत्येक नेत्यांवर एका प्रभागाची जबाबदारी टाकणार असून ११ जुलै राेजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष तथा अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी भूमिका विषद केली. 


नगरसेवकांची पुन्हा हजेरी 
नगरसेवक फुटू नयेत या भीतीपाेटी राष्ट्रवादीने गेल्या अाठवड्यात नीलेश पाटील यांच्या लेटर पॅडवर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पक्ष साेडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेतले हाेते. तरी देखील ५ नगरसेवक फुटल्याने रविवारी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी बैठकीत उपस्थित नगरसेवक दीपाली पाटील, अाश्विनी देशमुख, राजू माेरे, लता माेरे यांना उभे करून त्यांना पक्षासाेबत असल्याबाबत विचारले. 


बेईमान गेल्याचा अानंद 
काही लाेक पक्ष साेडून गेले, याचे दु:ख नाही. उलट बेईमान लाेक लवकर बाहेर पडले, याचा आनंद अाहे. ते उशिरा गेले असते तर पक्षाचे नुकसान झाले असते. गेले ते 'कावळे' अाणि राहिले ते 'मावळे' अाहेत. अातापर्यंत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेेले लाेक इतर पक्षांत काेठेही दिसत नाहीत. भाजपमध्ये खडसे-महाजन दाेन्ही नेते अाेढाताण करत अाहेत. पळून गेलेल्यांसाठी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कांॅग्रेसचे कुंकू कधीही श्रेष्ठच हाेते. परंतु, ते त्यांना कळत नसल्याचे माजी खासदार ईश्वरलाल जैन म्हणाले. 


नीलेशचा पराभव करू 
मी विश्वास दाखवून महानगर अध्यक्षासाठी नीलेश पाटील याची शिफारस केली हाेती. परंतु, त्याने एेनवेळी मला धाेका दिला अाहे. त्याने माझ्यासह पक्षाची देखील फसवणूक केली अाहे. पक्षातून बाहेर पडला असला तरी ताे निवडून येणार नाही, हे मात्र नक्की अाहे. ताे निवडून येऊ नये, यासाठी सर्व ताकद लावून काळजी घेणार असल्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या बैठकीत जाहीरपणे नमूद केले अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...