आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणूक : प्रभाग १९, जागा ७५, उमेदवारांचे अर्ज ६१५, माघारीसाठी मंगळवारपर्यंत मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा बुधवारी अाटाेपला. १९ प्रभागांतील ७५ जागंासाठी ६१५ अर्ज दाखल झाले अाहेत. यात इच्छुकांची संख्या माेठी असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अाले हाेते. यात शिवसेना व भाजपने प्रत्येकी ७५ जणांना उमेदवारी दिली. यात सगळ्यात जास्त ३९० अपक्षांनी अर्ज दाखल केले. माघारीसाठी राजकीय पक्षांचा चांगलाच कस लागणार अाहे. सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली अाहे. 


उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत हाेती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या अावारात प्रचंड गर्दी झाली हाेती. सकाळी ८ वाजेपासून पाेलिस बंदाेबस्त तैनात हाेता. महापालिकेच्या समाेरील रस्ता वाहतुकीसाठी बंद हाेता. नेहरू चाैकाकडून पालिकेकडे येणारा व गाेलाणीकडून पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावले हाेते. सर्वत्र पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय पक्षांचे उमेदवार व समर्थकांची धावपळ उडाली. 


खडकेंची तिसरी पिढी महापालिकेच्या रिंगणात 
पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक अशी अाेळख असलेले वामनराव खडके यांनी स्वत: निवडणूक न लढता मुलगा सुनील खडके यांना पुढे केले अाहे. वामनराव खडके हे १९६४ पासून नगरसेवक हाेते. यंदा त्यांची दहावी निवडणूक हाेती. वामनराव यांचे वडील पंडितराव नारायण खडकेही नगरसेवक हाेते. सुनील खडकेंच्या निमित्ताने त्यांची तिसरी पिढी रिंगणात उतरली अाहे. 


राजकीय धक्कातंत्राचा केला वापर 
महापालिकेच्या सन २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीतून खाविअात दाखल झालेले व उपमहापाैरपदाचा कारभार सांभाळणारे गणेश बुधाे साेनवणे यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात अाली. खाविअाएेवजी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढली जात असताना विद्यमान उपमहापाैरांचा पत्ता कापला गेला. खाविअाचे अध्यक्ष व शिवसेनेची संपूर्ण धुरा सांभाळत असलेले रमेश जैन यांनी यंदा प्रत्यक्ष रिंगणात न उतरता संपूर्ण निवडणुकीची सूत्रे ताब्यात ठेवली अाहेत. गेल्या तीन पंचवार्षिकपासून पालिकेच्या सभागृहात दाखल हाेत त्यांनी अापली पकड कायम ठेवली हाेती. अाता ते रिंगणाबाहेर असतील. 


अॅड. नरेंद्र पाटलांची विश्रांती 
पालिकेच्या सभागृहात सन १९८४ पासून सतत निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. नरेंद्र भास्कर पाटील हे सध्या मानेच्या मणक्यांना दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेत अाहेत. सलग नऊ वेळा निवडणूक लढवून ते सभागृहात दाखल झाले हाेते. सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या धाेरणात्मक निर्णयांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे काम नगरसेवक पाटील करीत हाेते. यंदा त्यांची दहावी निवडणूक हाेती. परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांनी निवडणूक लढणे टाळले अाहे. 


मनसे व भाजपच्या नगरसेवकांना सेनेची साथ 
मनसेचे नेते ललित काेल्हे अचानक भाजपत गेल्यानंतर त्यांच्या साेबतच्या नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लिना नवीन पवार व अनंत जाेशी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय न दिल्याने पृथ्वीराज साेनवणे यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. 

बातम्या आणखी आहेत...