आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मनपा निवडणुकीत चित्र बहुरंगी, लढती होणार मात्र तिरंगीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. अर्ज वैध ठरलेल्या ४२७ उमेदवारांपैकी मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १२४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी ३०३ उमेदवार रिंगणात अाहेत. यात भाजपचे ७५ तर शिवसेना ७० तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे ५८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढणार अाहेत. ८२ अपक्षांमुळे जवळजवळ सर्वच प्रभागात बहुरंगी लढतींचे चित्र आहे. परंतु खरी लढाई भाजप- शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगीच होणार आहे. 


महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ अाॅगस्ट राेजी हाेणार अाहे. तर मतमाेजणी ३ अाॅगस्ट राेजी करण्यात येणार अाहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ६१५ जणांनी सहभाग घेतला हाेता. छाननी दरम्यान ४२७ अर्ज वैध ठरले होते. दरम्यान माघारी्ंती रिंगणात ३०३ उमेदवार शिल्लक राहिले असून १२४ जणांनी माघार घेत निवडणूकीपासून लांब राहणे पसंत केले आहे.


जलसंपदामंत्री महाजन-सुरेश जैन यांची प्रतिष्ठा पणाला 
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठी दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी मैत्रीचे हात पुढे केले हाेते. परंतु युतीसंदर्भात चर्चा न झाल्यामुळे युतीचे त्रांगडे कायम राहिले. निवडणुकीचे चित्र बहुरंगी दिसत असले तरी तिरंगी लढती हाेतील. यात युती न झाल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्यावतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेनेच्यावतीने माजी अामदार सुरेश जैन यांनी अनेक जागांवर बिनविराेध निवडीच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाजन आणि जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...