आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची ताकद ४७ जागांवर, भाजपला ४० जागा कशा साेडू? : रमेश जैन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला अाहे. युतीत याेग्य सन्मान ठेवत असतील तर ठिक, अन्यथा स्वबळावर लढावे, असे स्पष्ट मत उमेदवारांनी व्यक्त केले अाहे. त्यामुळे शिवसेनेला ४७ जागांची अपेक्षा अाहे. भाजपने ४० जागांवर दावा केला असला, तरी कशाच्या अाधारे ही मागणी करताय? ते अाधी सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका खाविअाचे अध्यक्ष रमेश जैन यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली. 


महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली अाहे. भाजपपाठाेपाठ शिवसेनेच्या मुलाखतींना जाेरदार प्रतिसाद मिळू लागला अाहे. शक्तिप्रदर्शन करत इच्छुक उमेदवार खान्देश मिल शॉपिंग काॅम्प्लेक्समध्ये दाखल हाेत अाहेत. प्रभाग १ ते ९ साठी तब्बल १६८ जणांनी मुलाखत दिली अाहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या इच्छुकांकडूनही शिवसेनेच्या नेत्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत चाचपणी करून घेतली. युतीसंदर्भात कार्यकर्त्यांनी परखड मत व्यक्त केले अाहे. युती झाल्यास कार्यकर्त्यांना संधी देता येणार नाही, त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात रमेश जैन यांनी विकासाच्या उद्देशाने युती करत अाहाेत, शहराचे व जनतेचे नुकसान हाेऊ नये, यासाठीच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...