आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: एसटीच्या मार्गावर शहरात कुठेही 10 रुपयांत प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेची परिवहन सेवा नाेव्हेंबर २०१४ पासून बंद झाल्याने नागरिकांना रिक्षानेच प्रवास करावा लागत अाहे. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून पालिकेवर बससेवेसाठी दबाव वाढत अाहे; पण मनपाच्या अार्थिक परिस्थितीमुळे सेवा देणे शक्य नाही. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत एसटीच्या मार्गावर थांबे निश्चित करून १० रुपयात शहरातील नागरिकांना सेवा देण्यात येणार अाहे.

 

शहराचा वाढता विस्तार व वाढलेली लाेकसंख्या पाहता दळणवळणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण हाेणे गरजेचे अाहे. महापालिकेने अाॅक्टाेबर २०११ मध्ये परिवहन सेवा सुरू केली हाेती; पण संबंधित मक्तेदाराने पालिकेला काहीही न कळवता नाेव्हेंबर २०१४ मध्ये परिवहन सेवा परस्पर बंद करून टाकली हाेती. त्यामुळे ज्यांच्याकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहने नाहीत, अशा हजाराे नागरिकांना नाईलाजास्तव रिक्षाने प्रवास करावा लागत अाहे. मध्यंतरी रिक्षाचालकांनी भाडे वाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ साेसावी लागत हाेती. त्यानंतर रात्रीच्या वेळेस बसस्थानक व रेल्वे स्थानकावरून घरी जाणाऱ्या नागरिकांकडूनही अवाजवी भाड्याची अाकारणी केली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात अाला हाेता. एकंदर शासनाच्या माध्यमातून शहरात सार्वजनिक बससेवा सुरू करावी, अशी मागणी अाता माेठ्या प्रमाणात जाेर धरू लागली अाहे. त्याला जळगावातील एसटी महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे.

 

या मार्गावरील बसेसच्या माध्यमातून सेवा
एसटी महामंडळाच्या शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या बसेसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना शहरात सेवा देण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. पूर्वी यासाठी सात रुपये भाडे अाकारणी करण्यात येणार हाेती. परंतु नुकतीच भाडेवाढ झाल्याने अाता त्यात ३ रुपये वाढ करून शहरातील थांब्यांवर उतरण्यासाठी प्रवाशांकडून १० रुपये अाकारणी केली जाणार अाहे. एरंडाेल, पाचाेरा, अाैरंगाबाद, भुसावळ व चाेपडा व यावल या मार्गावरील बसेसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना ही सेवा उपलब्ध हाेणार अाहे.

 

१५ दिवसांत थांब्यांचे फलक
एसटी महामंडळाकडून महानगराच्या क्षेत्रात काेणत्या ठिकाणी थांबे द्यायचे, यासंदर्भात अारटीअाेंना पत्र दिले जाणार अाहे. अारटीअाेंच्या माध्यमातून थांबे निश्चित केले जाणार अाहे. येत्या १५ दिवसांत थांब्यांचे फलक तयार करून वाहक व चालकांना त्याची सूचना दिली जाईल. राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...