आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात वादळी पावसाने केळीचे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत, पालकमत्र्यांचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील रावेर पूर्व भागात 1 जून तर सावदा परिसरात 5 जून वादळी पावसाने तडाखा दिला. या वादळी पावसामुळे आतापर्यंत केळीचे 63 कोटींचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे करोडो रुपयांच्या झालेल्या नुकसानीला सहा दिवस उलटले आहेत. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असूनही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी किसान सभेतर्फे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

 

किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांशी चर्चा करून केळीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष समाधान साबळे, भागवत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...