आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे-दमानिया प्रकरण: चोपडा अर्बन बँकेच्‍या व्‍यवस्‍थापकासह तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धनादेशांच्या बनावट छायांकित प्रती तयार करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची फसवणूक करण्याचा कट रचल्याप्रकरणी चोपडा अर्बन को. बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा अर्बन काे. बँकेचे व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (वय ४५), योगेश काशिनाथ बऱ्हाटे (वय ४०) व किशाेर लक्ष्मण अत्तरदे (वय ४७, तिघे रा. चोपडा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जळगाव येथील अॅक्सीस बँकेच्या नावाचा साडेनऊ कोटी आणि चोपडा अर्बन को. बँकेच्या नावे १० लाख रुपयांचा बनावट धनादेश तयार केल्याचा दमानिया आणि इतर सहा जणांवर आरोप आहे. 


साडेनऊ कोटींचा आणि १० लाखांचा अशा दोन धनादेशांच्या बनावट छायांकित प्रती तयार करून खडसे यांची फसवणूक करण्याचा कट रचण्यात अाला हाेता. या प्रकरणी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम व चारमॅन फर्नस या ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...