आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणत्याही पक्षात जातील, पण खडसे भाजपत राहणार नाहीत; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जळगाव- भाजपत ४० वर्षे राहिलेले एकनाथ खडसे सध्या अस्वस्थ अाहेत. भाजप-सेना युती ताेडण्याची घाेषणा त्यांनी केली. परंतु ती त्यांच्या पक्षाची भूमिका हाेती. त्यांच्यासाेबत अामचे ममत्व नसले तरी त्यांच्याविषयी सहानुभूती नक्कीच अाहे. सध्याची परिस्थिती पाहता ते काेणत्याही पक्षात जातील, परंतु भाजपमध्ये राहणार नाही, असे भाकीत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी जळगावात अायाेजित पत्रकार परिषदेत केले.      


ते म्हणाले, युती ताेडण्याची घाेषणा खडसेंच्या ताेंडून झाली. युती ताेडण्याचा सर्वाधिक अानंददेखील खडसेंनाच झाला हाेता. त्या वेळी त्यांना मुख्यमंत्री हाेण्याचे स्वप्न हाेते. मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेला संपवण्याचा विचार त्यांच्या डाेक्यात हाेता. परंतु शिवसेनेवर तलवार उगारणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व धाेक्यात येत असल्याचा इतिहास अाहे. तरीदेखील खडसेंविषयी अाम्हाला सहानुभूती अाहे. शिवसेनेत अाले तर त्यांच्यासाठी चर्चेची दारे उघडी अाहेत. खडसे सध्या अजित पवारांच्या कानातच अधिक गाेष्टी सांगत असतात.    राज्यात सध्याची स्थिती पाहता  मुख्यमंत्री बदल हाेणार नाही. परवा भाजपचे मंत्री गिरीश बापट यांनी वर्षभरात निवडणुका हाेण्याचे जाहीर संकेत दिले अाहेत. त्यांच्या ताेंडून भाजपची भूमिकाच बाहेर पडली अाहे, असेही ते म्हणाले. 

 

सरकारसाेबत राहून कामे करणार    
राज्यात सत्ता बदलणे शिवसेनेसाठी सहज शक्य अाहे. परंतु समाेर सक्षम पर्याय नसल्यामुळे सरकारमध्येच राहून कामे करून घेण्याची शिवसेनेची भूमिका अाहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा नैतिक पराभव झाला अाहे. या निवडणुकीने राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेतृत्व मिळाल्याचे राऊत या वेळी म्हणाले. 

 

खडसे जो निर्णय घेतील त्याचे स्वागतच : मलिक

एकनाथ खडसेंवर पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे अन्याय होत असून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर भाजप सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. अशा परिस्थितीत खडसे जो निर्णय घेतील त्याचे राष्ट्रवादी पक्ष स्वागतच करेल, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. रावेर येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी पवार यांच्या शेतीविषयक धोरणांची प्रशंसा केली होती. तसेच अजित पवार यांच्या राजकीय निर्णय क्षमतेचेही त्यांनी कौतुक केले होते.   


मलिक म्हणाले, भाजपचे वरिष्ठ नेते खडसे यांना बारामतीतील शेती यंत्रणा सक्षम वाटते. बारामतीत शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते, त्याने ते प्रभावित झाले आहेत. पवार साहेबांचे विचार त्यांना पटत असावेत. त्यामुळे ते जर राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच होईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...