आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपड्यात बालरोग तज्ज्ञावर जीवघेणा हल्ला; कॅबिनमध्ये घुसून वस्ताऱ्याने केले वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे  बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील यांच्यावर मंगळवारी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास त्यांच्याच दवाखान्यात कॅबिनमध्ये घुसून वस्तार्‍याने हल्ला केला. हल्ल्यात डॉ आनंद पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी हा धरणगाव येथील रहिवासी आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, डॉ आनंद पाटील हे रात्री आपले काम संपवून कॅबिनमध्ये मोबाईल हाताळत होते. या दरम्यान अचानक आरोपी गोविंद दिलीप पाटील हा कॅबिनमध्ये घुसला. त्याने वस्ताऱ्याने डॉक्टरांवर वार केले.

 

धरणगाव येथील पद्मालय नगर येथील रहिवाशी गोविंद पाटील यांची पत्नी सुनिता गोविंद पाटील (२५) यांच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध बुधवारी सकाळी धरणगाव पोलिसांत मारहाण, शिवीगाळ करतो म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गोविंद पाटील पत्नीला तीन दिवसांपासून त्रास देत होता. त्यामुळे सुनिता ही माहेरी आली होती. याचा राग येऊन गोविंद याने डॉ. आनंद यांच्या कॅबिनमध्ये घूसून त्यांच्यावर वस्ताऱ्याने हल्ला केला. या घटनेत डॉ पाटील हे मात्र गंभीर जखमी झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...