आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरपावली सरपंच सविता जावळेंना 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, फरार ग्रामसेवकाचा चोपड्यात शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - कोरपावली येथील तत्कालीन सरपंच सविता संदिप जावळे यांना दिनांक 17 जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्यांना 14व्‍या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्‍या प्रकरणी अटक करण्यात आली होती. एप्रील 2016 ते जुन 2016 या कालावधित त्‍यांनी शासनाच्‍या 8 लाख 46 हजार 500 रूपयांच्‍या निधीचा स्‍वत:च्‍या फायद्याकरीता वापर केला म्‍हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांनी त्‍यांच्‍या विरोधात यावल पोलिसांत 20 नोव्हेबंर 2017 रोजी गुन्‍हा दाखल केला होता.

 

बुधवारी सकाळी पोलिसांना चमका देत सरपंचा सविता जावळे यांनी गावातुन पोबारा केला होता. मात्र, सांयकाळी त्‍या जात असलेल्‍या एसटी बसचा भुसावळ तापी पुलापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी त्‍यांना अटक केली होती. गुरूवारी सविता जावळे यांना येथील प्रथमवर्ग न्यायधिश डी. जी जगताप यांच्या समोर हजर करण्‍यात आले. यादरम्‍यान त्यांना दिनांक 17 जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सपोनि योगेश तांदळे करीत आहे.


फरार ग्रामसेवकाचा चोपड्यात शोध
या गुन्ह्यातील संशयीत तत्कालीन ग्रामसेवक सुनिल चिंतामण पाटील यांना अटक करण्याकरीता पोलिसांच्‍या एका पथकाने चोपडा शहरात त्यांच्या शोध घेतला.  मात्र, ते तेथुन पसार झाले होते. त्यांच्या निवासस्थानीदेखील त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र तेथेही ते सापडले नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...