आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात मजुराची गोळी घालून हत्‍या, 2 संशयित ताब्‍यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- जिल्‍ह्यातील वार-कुंडाणे येथील 28 वर्षीय युवकाचा 11 डिसेंबरच्या रात्री गोळी घालून हत्‍या केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. दीपक दगडू वाघ अस मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वार-कुंडाणे या ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्‍या प्राथमिक माहितीनुसार, दिपक हा मोलमजुरी करत होता. सोमवारी रात्री तो आपल्या काही मित्रांसमवेत गप्पा मारत होता. तेव्‍हा एका मित्राजवळ असलेल्या पिस्तूलमधून दिपकवर गोळी झाडण्‍यात आली. यामध्‍ये दिपक गंभीर जखमी झाला व यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल आहे. गोळी लागण्‍यापूर्वी दिपकवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न झाला का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत. तसेच मारेकऱ्यांनी वापरलेली पिस्तुलचा देखील पोलीस शोध घेत आहे. दिपकच्‍या हत्‍येमागच कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...