आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण सारखेच मात्र मित्रांपेक्षा कमी पगार; नैराश्यातून युवकाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील एका कंपनीत नोकरीला असलेल्या जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याच्या मुलाने बुधवारी मध्यरात्री बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. समान शैक्षणिक पात्रता असतानाही मित्रांना पगार जास्त असल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर अाले. 


गणेश शिवलाल गालफाडे (वय २६, रा. पोलिस हौसिंग सोसायटी, शाहूनगर) असे मृत तरुणाचे     नाव आहे. तो वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल शिवलाल गालफाडे यांचा मुलगा आहे. त्याचे एमएस्सीपर्यंत शिक्षण झाले होते. तो वर्षभरापासून एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तत्पूर्वी दीड वर्ष त्याने गोवा येथे नोकरी केली होती. 


वडिलांसोबत रात्री १२ वाजेपर्यंत मारल्या गप्पा

शिवलाल गालफाडे यांनी मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर दुपारी ४.३० वाजता ते घरी परतले. गणेश घरीच होता. त्यानंतर रात्री गणेश याने वडिलांसोबत जेवण केले. दोघा जणांनी रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा मारल्या. गणेशला सकाळच्या शिफ्टमध्ये ड्यूटीवर जायचे होते. त्याचप्रमाणे शिवलाल यांनाही सकाळी ड्यूटीवर जायचे होते. त्यामुळे गणेश गालफाडे याच्या वडिलांना झोपा असे म्हणाला. त्यानंतर दोघेही झोपले. 


वडील शोधायला गेले अन् मुलाचा मृतदेह सापडला 
रात्री १.३० वाजेच्या सुमारास शिवलाल यांना जाग आली. पाणी पिल्यानंतर त्यांना खोलीमध्ये गणेश आढळून आला नाही. त्यांनी घरात शोध घेतला. त्याचे कपडे, मोबाइल व पाकीट घरातच होते. 


त्याने काहीच सांगितले नाही 
गणेशचे एमएस्सी मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झाले होते. हीच शैक्षणिक पात्रता असलेल्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त पगार होता. याचे त्याला दु:ख वाटत होते. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या तो शोधात होता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. मात्र, तो नैराश्यात असल्याचे कधी जाणवले नाही. याबाबत कधी माझ्याशी बोलला नाही. २ महिन्यापूर्वी माझी मुलगी नैना हिचे लग्न झाले. गणेशही व्यवस्थित स्थिर स्थावर झाल्यानंतर त्याचेही लग्न करण्याचा विचार सुरू होता, असे वडील शिवलाल गालफाडे यांनी सांगितले. गणेशने १० दिवसांपूर्वी बॅडपॅचचा मेसेज पाठवला असल्याचे मित्राने अंत्यसंस्कारानंतर त्याच्या वडिलांना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...