आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, जळगावचा 'सिटी बर्ड' निवडू या; प्लवा, शिक्रासह पाच पक्ष्यांचे मानांकन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात सहज दृष्टीस पडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. बागेत, घरांच्या छतावर, मेहरूण तलाव परिसर अशा अनेक ठिकाणी पक्ष्यांचा स्वच्छंद विहार पाहावयास मिळतो. पक्षिमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ हे गेल्या आठ वर्षांपासून शहरातील पक्ष्यांचा अभ्यास करीत अाहेत. त्यांनी २१४ प्रजातींची नोंद केली आहे. यात आकर्षक पक्ष्यांचा समावेश आहे. आता या प्रजातींमधून पाच पक्ष्यांची निवड करण्यात आली अाहे. त्यातील एकाची 'शहर पक्षी' म्हणून निवड करण्याची भूमिका 'दिव्य मराठी'सह गाडगीळ दांपत्याने घेतली आहे. ही निवड मतदानातून करायची असून शहराचे सौंदर्य, मोहकता, वैशिष्ट्य निवडून देण्यासाठी 'दिव्य मराठी'ने हा पुढाकार घेतला. 


पाच पक्ष्यांची उमेदवार पक्षी म्हणून निवड केली आहे. यात हळदी-कुंकू अथवा प्लवा (स्पॉटबिल डक), शिक्रा, भारतीय राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल), पांढऱ्या गळ्याचा खंड्या (व्हाइट थ्रोटेड किंगफिशर) व तांबट (कॉपरस्मित बारपेट) यांचा समावेश आहे. जळगावचा 'शहर पक्षी' निवडण्यामागील हेतू पर्यावरणाशी नाते जाेडणे हा अाहे. सहभागी व्हावे, असे अावाहन दिव्य मराठी व गाडगीळ दांपत्याने केले आहे. 

 

मतदानाची प्रक्रिया पुढील भागात 
"दिव्य मराठी'ने घेतलेल्या या पुढाकारात शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. संबंधित पक्ष्यांना मत देण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुढील भागात मतपत्रिका 'दिव्य मराठी'तून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


पुढील स्लाइडवर वाचा, असे आहे निवड केलेल्या इतर चार पक्ष्यांचे वैशिष्ट्ये...

बातम्या आणखी आहेत...