आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल- चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला, कुटुंबियांना घातपाताचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- नायगाव येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. कडू माधव मेढे (58) हा इसम सोमवार पासून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

कडू माधव हे सोमवारी सावखेडा शिवारातील आपल्या शेतात गेले होते पण संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना फोन केला व घरी लवकर या असे सांगितले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांनी शोधाशोध केली.  पुन्हा त्यांच्या मोबाईलवर कॉल केला मात्र कॉलही त्यांनी घेतला नाही, गेले तीन दिवस त्यांचे कुटुंबिय त्यांना शोधत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या सावखेडासिम शिवारातील शेताच्या दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी मेढे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

 याबाबत यावल पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक एम जे मोरे उपनिरीक्षक अशोक आहिरे, हवालदार संजीव चौधरी, पांडुरंग सपकाळे, सिकंदर तडवी, राहुल चौधरी हे पथकासह दाखल झाले तर मेढे यांच्या कुटुंबाला या यासंदर्भात माहिती देण्यात आली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सायंकाळी यावल ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे याठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ रश्‍मी पाटील या शवविच्छेदन करीत आहेत 

 

घातपाताचा संशय

काही दिवसापूर्वी मयत मेढे यांच्या भावाच्या घरावर झाड पडले होते. त्यावरून नायगावचे सरपंचासह त्या भागातील नागरिकांचा आणि त्यांचे वाद झाले होते. तसेच मयत मेढे यांचे हिंगणा गावातील येथील एका महिलेशी देखील अनैतिक संबंध असल्याचं समोर आला आहे या दोन्ही कारणावरून त्यांचा घात झाला असावा असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे

 

बातम्या आणखी आहेत...