आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- जळगाव महामार्गावर अज्ञात वाहनाची स्विफ्ट कारला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा-  धुळे-जळगाव मोंढाळे गावाजवळ मध्यरात्री 12.30 वाजता स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही या भीषण धडकेच कारचा चालक जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

या बाबत विलास हिरालाल तिवारी (इंद्रप्रस्थ नगर जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे गुरुवारी रात्री अनिल प्रभाकर सोनवणे ,शुभम लोहार वय 32  व कल्पेश मनोहर कापडणे 22  रा ईश्वर कॉलनी जळगाव हे धुळ्या कडून रात्री 12 वाजता आपल्या स्विफ्ट क्रमांक एम एच 19 बी जे 0609 ने जळगावला येत असताना मोंढाळे गावाजवळ सेफ एक्सप्रेस गोदामा समोर एका अज्ञात वाहनाने सामोरा समोर धडक दिली. यात मारुती स्विफ्ट गाडीचा पुढील भाग चक्काचूर होउन चालक अनिल प्रभाकर सोनवणे (वय 40) हे जागीच ठार झाले. तर शुभम लोहार व कल्पेश कापडणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना कृषी भूषण साहेबराव पाटील रुग्ण वाहिकेचे चालक ईश्वर ठाकूर यांनी धुळे येथे हलविले. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद करुन पुढील तपास स व नि सुधाकर लहारे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...