आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान भावावर अक्षता पडल्यानंतर जखमी माेठ्या भावाने साेडला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाराेळा- लहान भावावर बेटावद या गावात अक्षता पडताच तासाभरानंतर अपघातात जखमी झालेल्या मोठ्या भावाने जळगावात जीव साेडला. जन्मदात्यांच्या एका डाेळ्यात हसू तर दुसऱ्या डाेळ्यात अासू, असे चित्र वऱ्हाडींना अनुभवायला अाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विवाहानंतरचे सर्व कार्यक्रम रद्द करून पाराेळ्यात पाेहाेचलेले वऱ्हाडी शाेकसागरात बुडाले. 


पाराेळ्याच्या सानेगुरुजी काॅलनीत किसान महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी अाप्पा भास्कर पाटील हे राहतात. त्यांना तीन मुले अाहेत. दाेन क्रमांकाचा मुलगा राेशन पाटील (वय ३०) हा गुरुवारी (दि.३) दुचाकीने (क्रमांक एमएच १९ सीसी ७८४७) घराकडे येत हाेता. अमळनेर रस्त्यावर भाेकरबारी गावाजवळ तपाेवनसमाेर अाेम्नीने (क्रमांक एमएच १९ एएक्स ३६८२) त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ताे गंभीर जखमी झाला. पाराेळा कुटीर रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात अाले. त्यानंतर जळगावच्या खासगी रुग्णालयात हलवले. अपघातात त्याचा एक पाय निकामी हाेऊन डाेक्यावर गंभीर जखम झाली हाेती. लहान भाऊ राहुल याचा विवाह ६ मे राेजी बेटावद येथे नियाेजित हाेता. माेठा मुलगा मृत्यूशय्येेवर असताना लहान्याचा विवाह साेहळा अाटाेपायचा कसा? असा पेचप्रसंग वडील अाप्पा पाटील यांच्यासमाेर उभा ठाकला हाेता. नातेवाईक व वधूपक्षाकडील मंडळींनी धीर दिल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.६) बेटावद गाठले. 


लहान मुलगा राहुल याच्यावर दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान अक्षता पडल्या. वधू-वराने सातफेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर एक तासात म्हणजेच दुपारी २ वाजेच्या सुमारास 'वराचा माेठा भाऊ राेशन याचा जळगावात मृत्यू झाल्याचा निराेप लग्नमंडपात येऊन धडकला तसा सर्वत्र सन्नाटा पसरला. 

 

मनमिळावू स्वभाव 
मृत राेशनचा स्वभाव शांत व मनमिळावू हाेता. पाराेळ्यातील सानेगुरुजी, प्राेफेसर, साईबाबा काॅलनी भागात ताे मदतीसाठी धावून जायचा. त्याच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच समाजमन सुन्न झाले. सायंकाळी ५.३० वाजता त्याची अंत्ययात्रा निघाली. 


घटना समजताच पत्नी बेशुद्ध 
मृत राेशन हा एका विनाअनुदानित शाळेत कलाशिक्षक म्हणून काही वर्षे नाेकरीला हाेता. मात्र, तेथे पगाराचे वांधे असल्याने ताे गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून अमळनेर येथे एका खासगी कंपनीत नाेकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याला चार वर्षाचा एक मुलगा अाहे. रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान राेशनचा मृत्यू झाल्याची माहिती पत्नी याेगीताला कळवली नव्हती. परंतु, बेटावद येथून वऱ्हाडींसाेबत परत अाल्यानंतर तिला ही माहिती समजली. त्याच क्षणी तिची शुद्ध हरपली. 


नवविवाहीत भाऊ शाेकमग्न 
विवाहाच्या दिवशीच अापल्या भावाची प्राणज्याेत मालवल्याने लहान भाऊ राहुल याने अश्रुंना वाट माेकळी करून दिली. मृत राेशनच्या चार वर्षाचा मुलाकडे पाहून नातेवाईकांना अश्रु अावरणे कठीण झाले. बेटावद येथे लग्नघरीही शाेक व्यक्त करण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...