आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ल्याच्या घटनेने मेहरूण परिसरात फिरायला जाण्याचे अनेकांनी टाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण तलावाजवळ सकाळी फिरायला गेलेल्या वयस्कर व्यावसायिक नरेंद्र ठाकूर यांच्यावर साेमवारी हल्ला झाला. या घटनेमुळे मंगळवारी फिरायला जाण्याचे अनेकांनी टाळले. यात महिलांचे प्रमाण जास्त हाेते. त्यामुळे मेहरूण तलाव ट्रॅकवर शुकशुकाट हाेता. 


मेहरूण तलाव परिसरात शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक दरराेज सकाळी फिरायला जातात; परंतु साेमवारी सकाळी ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक नरेंद्र ठाकूर यांच्या डाेळ्यात मिरची पुड फेकून डाेक्यावर गावठी बंदुकीचा दस्ता मारून दराेडेखाेरांनी त्याची कार चाेरून नेली. मेहरूण परिसरात यापूर्वी अशी घटना कधीच घडली नसल्याने फिरायला जाणाऱ्यांमध्ये या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले अाहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी फिरायला येणाऱ्यांची संख्या ४० ते ४५ टक्के घटली हाेती. या परिसरात अनेक महिला या एकट्याच फिरायला येतात. त्या मंगळवारी या परिसरात फिरकल्याच नाहीत. इतरांपैकी अनेकांनी घटनेची धास्ती घेऊन या परिसरात फिरायला येणे टाळले होते. 


नेहमीच्या तुलनेत महिला कमी अाल्या 
तलावाच्या परिसरात अनेक वर्षांपासून फिरायला येणाऱ्यांपेक्षा मंगळवारी संख्या घटलेली जाणवली. त्यातही महिलांची संख्या नगण्य हाेती. पती,पत्नी जाेडीने येणाऱ्यांचेही प्रमाण कमी जाणवले. माेठी घटना घडूनही या परिसरात पाेलिस बंदाेबस्त किंवा पाेलिसांनी हजेरी लावली नाही. 
- उमंग मेहता, शेअर ब्राेकर 


नेहमी मेहरूण परिसरात फिरायला येणाऱ्यांची वर्दळ मंगळवारी कमी वाटली. जवळपास ४० टक्क्यांपर्यंत संख्या घटली असावी. जे फिरायला अालेले हाेते, ते साेमवारच्या हल्ल्यांच्या घटनेवरच बाेलत हाेते. त्यामुळे राेजच्या सारखा उत्साह या परिसरात जाणवत नव्हता.
-  अायुष मणियार, व्यावसायिक 

बातम्या आणखी आहेत...